सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आज 95 जणांना कोरोनाची लागण झाली आहे तर 6 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचेही स्पष्ट झाले आहे. एकाच दिवशी 111 जण कोरोना मुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
आज कोरोना चाचणीचे 1 हजार 603 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील 1 हजार 508 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. 95 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील एकूण कोरोनाबाधित व्यक्तींची संख्या आता 30 हजार 772 झाली आहे. आतापर्यंत 917 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
2 हजार 420 जण सध्या ऍक्टिव्ह कोरोना बाधित रुग्ण असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.आतापर्यंत 27 हजार 435 जण कोरोना मुक्त झाले आहेत.
आज ‘या’ गावातील सहा जणांचा मृत्यू
मोहोळ तालुक्यातील कुरुल येथील 58 वर्षिय पुरुष, पंढरपूर तालुक्यातील इसबावी येथील 45 वर्षिय पुरुष, दक्षिण सोलापूर तालुक्यातील निम्बर्गी येथील 69 वर्षिय पुरुष, पंढरपूर तालुक्यातील रोपळे येथील 45 वर्षिय पुरुष, पंढरपुरातील नवीपेठेतील 65 वर्षिय पुरुष, बार्शीमधील रोडगा रस्ता येथील 80 वर्षिय पुरुष यांचा समावेश आहे. कोरोना चाचणीचे अद्यापही 34 अहवाल प्रलंबित आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज