सोलापूर शहरात व जिल्ह्यातील ग्रामीण भागात आज 154 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 11 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.यामध्ये ग्रामीण भागामध्ये 120 जण व शहरात 34 जण कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले आहे.
आज ग्रामीण भागात एकूण 1 हजार 399 जणांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 1 हजार 279 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह तर 120 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आत्तापर्यंत कोरोनामुक्त झाल्यामुळे 24 हजार 421 जणांना आपापल्या घरी सोडले आहे.
जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये आज झालेल्या अहवालानुसार बाधितांची संख्या आता 28 हजार 923 एवढी झाली आहे. कोरोनामुळे ग्रामीण भागात आत्तापर्यंत 823 जणांचा बळी गेला आहे. वेगवेगळ्या रुग्णालयात अद्यापही कोरोनाग्रस्त असल्यामुळे तीन हजार 679 जणांवर उपचार सुरू आहेत.
आज ‘या’ दहा जणांचा मृत्यू
पंढरपूर तालुक्यातील एकलासपूर येथील 65 वर्षांचे पुरुष, गादेगाव (ता. पंढरपूर) येथील 65 वर्षाचे पुरुष, नेवरे (ता. माळशिरस) येथील 65 वर्षाचे पुरुष, खिलारवाडी (ता. सांगोला) येथील 50 वर्षाची महिला, बेंबळे (ता. माढा) येथील 66 वर्षांची महिला,
तर पंढरपूर शहरातील रोहिदास चौक येथील 65 वषाचे पुरुष, गवत्या मारुती चौक मोहोळ येथील 65 वर्षाचे पुरुष, प्रदक्षिणा रोड पंढरपूर येथील 78 वर्षाची महिला, कोरवली (ता. मोहोळ) येथील 45 वर्षाचे पुरुष तर वागदरी (ता. अक्कलकोट) येथील 65 वर्षाच्या महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
सोलापूर शहरात 34 जण पॉझिटिव्ह
सोलापूर शहरातील कोरोनाचा संसर्ग कमी होऊ लागला आहे. मात्र, आता कोरोना रुग्णाच्या संपर्कातून कोरोनाचा प्रसार वाढत असल्याचे दिसून येत आहे.
आज (रविवारी) 320 संशयितांची टेस्ट करण्यात आली असून त्यात 34 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामध्ये रुग्णांच्या संपर्कातून 14 जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे.
त्यात अंत्रोळीकर नगरात दोन, वानकर वस्ती परिसरात (देगाव) तीन, निलम नगरात चार, निराळे वस्ती परिसर, करंजकर सोसायटी (शेळगी) येथे प्रत्येकी दोन रुग्णांचा समावेश आहे.
शहरात आज रंगराज नगर, लिमयेवाडी, विशाल नगर (जुळे सोलापूर), माणिक चौक (शुक्रवार पेठ), अंत्रोळीकर नगर, वानकर वस्ती (देगाव), उमा नगरी (मुरारजी पेठ), निला नगर, रुपाभवानी रोड, रेल्वे लाईन्स, कर्णिक नगर, अभिषेक नगर (जुना पुना नाका), वसंत विहार भाग- तीन,
तर आसरा चौक, लक्ष्मी नगर (बाळे), अमर नगर (बसवेश्वर नगर), स्वामी विवेकानंद नगर, प्रियदर्शनी नगर (जुना विडी घरकूल), निलम नगर, दमाणी नगर, करंजकर सोसायटी (शेळगी), आदित्य अपार्टमेंट (लष्कर), शाहीर वस्ती येथे नवे रुग्ण सापडले आहेत.
तर भवानी पेठ परिसरातील वर्धमान नगरातील 64 वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत शहरातील 94 संशयित होम क्वारंटाईन असून 103 संशयित इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनमध्ये आहेत.(सकाळ)
Solapur city and rural 154 corona positive 11 corona killed today
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज