राज्यात हवामान खात्याने 13 ते 17 ऑक्टोबर या कालावधीत विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवल्याने शहर व गाव पातळीवरील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपत्कालीन परिस्थितीवर लक्ष ठेवून दक्ष राहण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने दिले असल्याची माहिती तहसीलदार स्वप्नील रावडे यांनी दिली.
या कालावधीत आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास पूर्णवेळ कर्मचारी उपलब्ध ठेवून झाड व इमारत पडणे इत्यादी परिस्थितीत शोध व बचाव कार्य तातडीने नियोजन करावे.
अतिवृष्टीमुळे जुन्या मोडकळीस आलेल्या इमारती पूल इत्यादी ठिकाणी आपत्कालीन परिस्थिती उद्भवू नयेत यासाठी आवश्यक ती दक्षता घ्यावी. तसेच गरज भासल्यास या ठिकाणी वाहतूक सुरक्षित ठिकाणी वळवण्यात यावी किंवा तात्पुरती थांबवण्यात यावी.
अतिवृष्टीमुळे अडकलेल्या लोकांची सुटका करण्यासाठी सुरक्षित ठिकाणी हलविण्यासाठी रुग्णवाहिका, पट्टीचे पोहणारे,आरोग्य अधिकारी,जेसीबी मशीन इत्यादी बाबी सज्ज ठेवण्यात याव्यात.
अतिवृष्टी होताना कोणीही नदी,नाले, ओढे या ठिकाणी प्रवेश करू नये,व सेल्फी काढू नये. पावसात विजा चमकत असल्यास झाडाखाली उभे राहू नये.मोबाईलवर संभाषण कनये. इलेक्ट्रॉनिक वस्तू पासून दूर राहण्याबाबत नागरिकांना नगरपालिका व ग्रामपंचायतींमध्ये व इतर ठिकाणी आवश्यकतेप्रमाणे दर्शनी भागावर याबाबतच्या सूचना फलक लावावा.
त्याबाबत जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे उद्भवलेल्या कुठल्याही आपत्कालीन स्थितीमध्ये 0217- 2731012 व 1077 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा नागरिक आणि कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. अशा सूचना प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेल्या आहे.
दामिनी लाइटिंग अलर्ट हे ऍप आपापल्या क्षेत्रात पडणाऱ्या आगाऊ वीज कोसळण्याची माहिती देते तसेच वीज पाण्यापासून संरक्षण करावयाच्या उपाययोजनांची माहितीसाठी डाऊनलोड करून घ्यावे व त्याबाबत जनजागृती करण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले असल्याची माहिती तहसीलदार रावडे यांनी दिली
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज