मंगळवेढा टाइम्स वृत्तसेवा :-
फेसबुकवर कमेंट केल्याच्या कारणावरून सचिन कलुबर्मे याचा खून केल्याप्रकरणात अटकेत असलेले नगरसेवक पांडुरंग नाईकवाडी यास पंढरपूर येथील जिल्हा सत्र न्यायाधीश एन.के.मोरे यांनी मंगळवारी तीस हजार रूपयांचा जामीन मंजूर केला. गल्लीत प्रवेश न करण्याच्या अटीवर हा जामीन नगरसेवक नाईकवाडी यास मिळाला आहे.
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क : 7588214814
२५ एप्रिल रोजी मंगळवेढा शहरातील मुरलीधर चौकातून एका लग्नाची वरात जात असताना भर चौकात सचिन ज्ञानेश्वर कलुबर्मे याचा कोयत्याने गळ्यावर वार करून खून करण्यात आला होता. या प्रकरणात नगरसेवक पांडुरंग नाईकवाडी यांना पोलीसांनी अटक केली होती.
पंढरपूर येथील मे. जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. के. मोरे यांनी रक्कम रू . ३० हजाराचा जामीन मंजूर केला आहे. व केसचा निकाल लागेपर्यंत फिर्यादी व त्यांच्या नातेवाईकांच्या राहतात त्या गल्लीत प्रवेश करायचा नाही व दुसर्या व चौथ्या शनिवारी मंगळवेढा पोलीस स्टेशनला हजेरी लावणे या अटीवर जामीन मंजूर केला आहे.
नगरसेवक पांडुरंग नाईकवाडी तर्फे अॅड.धनंजय हजारे यांनी काम पाहिले .तर सरकार तर्फे अँड.सारंग वांगीकर यांनी काम पाहिले.
सदरकामी जामीन अर्जावर युक्तिवाद करताना अॅड धनंजय हजारे यांनी सदर गुन्हा घडतेवेळी सदर नगरसेवक पांडुरंग नाईकवडी हजर नव्हता तसेच ज्या व्यक्तीने नगरसेवक पांडुरंग नाईकवाडी यांनी घटना घडल्यानंतर मुख्य आरोपी बाबासाहेब नाईकवडी यांना घेऊन जाताना बघितलेले साक्षीदार हे विरोधी पक्षाचे नगरसेवक यांचा नातेवाईक व हॉटेलातील कामगार आहे यावरून केवळ विरोधी पक्षातील नगरसेवक असल्याने सदर गुन्ह्यात राजकीय द्वेषापोटी सदर नगरसेवक पांडुरंग नाईकवाडी यांना खोटे गुंतवले आहे यातील इतर आरोपी जामीनावर मुक्त झालेले आहेत यासाठी उच्च न्यायालयातील दाखले हजर करुन इतर आरोपींना जामीन झाला आहे तसा यालाही जामीन मिळणेचा अधिकार आहे असा युक्तिवाद अॅड धनंजय हजारे यांनी केला. तर सरकार तर्फे अॅड सारंग वांगीकरसाहेब यांनी सदर आरोपीस जामीन मिळाल्यास तो नगरसेवक असल्याने साक्षीदारांवर दबाव आणेल. त्यामुळे त्याचा जामीन मंजूर करु नये.
साक्षीदार कलुबर्मे यांचेतर्फे अॅड अमोल देसाई यांनी आपल्या युक्तिवादात हा आरोपी मुख्य आरोपीस गुन्हा घडल्यानंतर घेऊन जाताना साक्षीदारांनी बघितले आहे त्यामुळे त्याचा गुन्ह्यात प्रत्यक्ष सहभाग असल्याचे दिसून येते त्यामुळे सदर आरोपीचा जामीन नामंजूर करण्यात यावा.
तिन्ही युक्तिवाद ऐकून पंढरपूर येथील मे. जिल्हा व सत्र न्यायाधीशसो मे एन. के. मोरे साहेब यांनी रक्कम रू . ३०, ०००/- चा जामीन मंजूर केला आहे. व केसचा निकाल लागेपर्यंत फिर्यादी व त्यांच्या नातेवाईकांच्या राहतात त्या गल्लीत प्रवेश करायचा नाही व दुसर्या व चौथ्या शनिवारी मंगळवेढा पोलीस स्टेशनला हजेरी लावणे या अटीवर जामीन मंजूर केला आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज