मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
मंगळवेढा तालुक्यातील लक्ष्मी दहिवडी येथे शुक्रवारी रात्री चार-पाच ठिकाणी घरफोड्या झाल्या असुन चोरीची तक्रार मंगळवेढा पोलिस स्टेशन देण्यासाठी गेलेल्या शिवाजी आदाटे यांची तक्रार नोंदवून न घेतल्यामुळे नागरीकांतून पोलिस प्रशासनाविषयी तीव्र संताप व्यक्त होत आहे.
शुक्रवारी रात्री १:३० दरम्यान लक्ष्मी दहिवडी तील शिवाजी आदाटे यांच्या घरातील तीन तोळ सोन रोख रक्कम ४५०० रूपये व चांदीच्या वस्तु असा ऐवजी चोरी गेला असुन याची तक्रार देण्यासाठी शिवाजी आदाटे पहाटे मंगळवेढा पोलिस स्टेशन मध्ये तक्रार देण्यासाठी गेले असता मंगळवेढा पोलिस स्टेशन मध्ये तक्रार घेतली नसल्याचे आदाटे यांनी सांगितले असुन तक्रार देण्यासाठी सकाळी यावे असे उत्तर ठाणे अंमलदार यांनी दिल्यामुळे पोलिस प्रशासन विषयी ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
एकाच वेळी लक्ष्मी दहिवडी मध्ये चार-पाच ठिकाणी चोरी झाल्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचा वातावरण निर्माण झाले आहे. शुक्रवारी संध्याकाळी शिवाजी आदाटे यांच्या घरातील सोन, चांदी व इतर वस्तू तर आशिप तांबोळी यांच्या घरातील रोख रक्कम १० हजार तर २२ हजार रूपये किंमतीचे मनगटी घड्याळ चोरी गेले असुन या ठिकाणी चोरट्याचा स्वेटर पडला आहे. याच राञी भगवान कुंभार यांच्या दुकान चे कुलुप तोडून पैशाचा ड्राव्हर उचकटला आहे. विलास कस्तुरे यांच्या घरातील कपाटातील साहित्य अस्तावेस्त केले आहे. वंसत कोष्टी व सिद्धेश्वर कोष्टी यांच्या घरातील कुलुप तोडून कपाटातील साड्या विसकटले आहे.
लक्ष्मी दहिवडी मध्ये एकाच राञी चार-पाच ठिकाणी घरफोड्या झाल्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचा वातावरण निर्माण झाले असुन चोरी झालेल्या एका ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये दोन चोरटे कैद झाले असुन त्या फुटेजच्या आधारे पोलिस नाईक सोनलकर व पोलिस पाटील मधुकर पाटील यांनी माहिती घेतली आहे. पोलिस नाईक सोनलकर व पोलिस पाटील मधुकर पाटील यांनी घटना स्थळी भेट दिली असुन घडलेल्या ठिकाणची माहिती घेतली आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज