मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
खुनाच्या गुन्ह्यात अटकेमध्ये असलेल्या दादासाहेब दिगंबर लेंडवे (वय.४८ रा.लेंडवे चिंचाळे ता. मंगळवेढा) याने आज सोमवारी पहाटे मंगळवेढा येथील सबजेलमधून भिंतीवरून उडी मारून पलायन केले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, सन २०१२ साली टमटमच्या भाड्यावरून झालेल्या वादात दादासाहेब लेंडवे यांनी एक मर्डर व दोन हाफ मर्डर केले होते.
भा.द.वी३०२, ३०७, ३२६, ५०४, ५०६, ३४ मधील न्यायालयीन कोठडीत सबजेल मंगळवेढा येथे असणारा आरोपी दादासाहेब दिगंबर लेंडवे वय वर्षे -४८ राहणार लेंडवे चिंचाळे हा दिनांक ०३/१२/२०१८रोजी सकाळी शौचास बाहेर काढला असता तो सबजेलचे कंपाऊंड भिंतीवरून चादरी फाडून एकमेकांना गाठी मारून पळून गेला आहे.
अंगाने सडपातळ, रंगाने गोरा, नाक सरळ, डोकीस पुढील भागात टक्कल पडलेले, नेसनेस चट्ट्या पट्ट्याची नाडीची अंडरवेअर, फुल बाह्याचे पांढरे बनियन, अंगावर विटकरी रंगाची शाल, डोक्यास मफलर बांधलेला आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज