टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा शहरात व तालुक्यातील ग्रामीण भागात आज 13 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली असून एकूण बाधितांची संख्या 957 वर गेली आहे.
आज दिनांक 17 सप्टेंबर रोजी नागरिकांचे स्वब ( RT – PCR ) कोरोना चाचणी अहवाल तपासणी कामी घेणेत आलेले नाहीत. तसेच आज 88 रॅपीड अॅन्टीजन टेस्ट घेण्यात आलेल्या आहेत.
वरील 88 रॅपीड अॅन्टीजन टेस्ट पैकी पॉझिटिव्ह 11 आणि निगेटिव्ह 77 जणांचे अहवाल आलेले आहेत.सदरचे नागरिक हे मंगळवेढा शहर 4 , दामाजीनगर 3 , रडडे 1 , मारोळी 2 आणि गणेशवाडी 1 येथील आहेत.
सोलापूर येथे पाठविणेत आलेले स्वब ( RT – PCR ) चे 2 पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाले आहेत. सदरचे नागरिक हे अकोला 1 आणि निंबोणी 1 येथील कोरोना रूग्णांच्या निकटतम संपर्कातील आहेत.
मंगळवेढा तालुक्यात आतापर्यंत 957 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर 421 रुग्णांना उपचार कालावधी नंतर घरी सोडण्यात आले आहे. आणि आतापर्यंत 518 रुग्णांवर उपचार सुरू आहेत व आत्तापर्यंत 18 जणांचा मृत्यू झाला आहे.
सांगोला तालुक्यात आज आणखी 50 जणांना कोरोनाची लागण
सांगोला शहरात लॉकडाउन सुरू होऊन तीन दिवस झाले असून कोरोना बाधितांची संख्या मात्र कमी होईना आज पुन्हा 50 रुग्णांची वाढ झाली आहे.
आज दि.17 सप्टेंबर रोजी नागरिकांचे स्वॅब ( RT – PCR ) कोरोना चाचणी अहवाल तपासणी कामी घेणेत आलेले नाहीत.तसेच आज 345 रॅपीड अॅन्टीजन टेस्ट घेण्यात आलेल्या आहेत.
वरील 345 रॅपीड अॅन्टीजन टेस्ट पैकी पॉझिटिव्ह 50 आणि निगेटिव्ह 295 जणांचे अहवाल आलेले आहेत.
सदरचे नागरीक हे सांगोला 14 , ढाळेवाडी 1 , महुद 3 , लक्ष्मीनगर 4 , वाकी शिवणे 1 , महिम 1 , घेरडी 1 , चोपडी 1 , सोमेवाडी 1 , कोळा 1 , हबिसेवाडी 1 , सोनंद 7 , जवळा 2 , लोणविरे 3 , कडलास 2 , अनकढाळ 1 , जुनोनी 2 , हलदहिवडी 1 , मेडशिंगी 1 , डोंगरगांव 1 आणि बागलवाडी 1 येथील आहेत.
सोलापूर येथे पाठविणेत आलेल्या स्वब ( RT – PCR ) चे पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाले नाहीत.
सांगोला तालुक्यात आतापर्यंत 1 हजार 312 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर 560 रुग्णांना उपचार कालावधी नंतर घरी सोडण्यात आले आहे. आणि आतापर्यंत 740 रुग्णांवर उपचार सुरू आहेत व आत्तापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाला आहे.
नागरिकांची योग्य ती काळजी घेत प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9561617373 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज