मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
मंगळवेढा नगरपालीकेचे मुख्याधिकारी निलेश देशमुख यांची मंगळवारी तडकाफडकी बदली करण्यात आली. ते आता किनवट जि. नांदेड येथे रुजू होणार असून पलूस जि.सांगली येथील श्रीमती पल्लवी पाटील यांची मंगळवेढ्याच्या मुख्याधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
मंगळवेढा नगरपालिकेचा कारभार हातात घेतल्या पासून या ना त्या कारणाने सतत चर्चेत होते. निलेश देशमुख व नगरसेवक किंवा नगरसेविकांचे पती यांच्या बरोबर नेहमीच खटके उडत होते. अनेक वेळा देशमुख भेटतच नसल्याचा आरोप नगरसेवक करत होते.
मंगळवेढा विकासाच्या बाबतीत वंचित राहत आहे.मुख्याधिकारी निलेश देशमुख हे वारंवार कामावर गैरहजर असतात याबाबत आ.भारत भालके यांनी विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता.
मुख्याधिकारी निलेश देशमुख हे कामावर येत नाहीत, नगरपालिकेमध्ये हजर राहत नाहीत, नगराध्यक्षांना कोणतीही माहिती न देता वारंवार गैरहजर राहत होते.मंगळवेढा नागरपालिकेस महिला मुख्याधिकारी मिळावी अशी ही नगराध्यक्षा सौ.अरुणा माळी यांनी केली होती त्यांच्या मागणीस यश मिळाले आहे.
पल्लवी पाटील या मूळच्या सांगलीतून असून डॅशिंग अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. आतापर्यंत त्यांनी जत, म्हसवड,पलूस येथे मुख्याधिकारी म्हणून काम पाहिले आहे. आपल्या कामाच्या डॅशिंग शैलीमुळे त्यांची ओळख आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज