मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
मंगळवेढा तालुक्यातील बठाण येथील २४ वर्षीय तरुण प्रभू रामदास बेदरे भीमा नदी मध्ये पोहण्यासाठी गेला असता त्याचा नदीमध्ये बुडून मृत्यू झाल्याची घटना आज बुधवारी सकाळी ८.३० च्या सुमारास घडली आहे.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 7588214814
याबाबत सविस्तर माहिती अशी की,मयत प्रभू बेदरे बठाण गावामध्ये असलेल्या भीमा नदीच्या पात्रात अंघोळीसाठी सकाळी गेला होता.पोहण्यासाठी नदीमध्ये उडी मारली व तो पाण्यामधून लवकर बाहेर येत नसल्याचे पाहून सर्वांनी त्याचा शोध घेतला असता तो मिळून आला नाही.गावातील ग्रामस्थांनी त्याला पाण्यातून बाहेर काढले.
पोहण्यासाठी गेलेला तरुण बुडाल्याचे कळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. पण तोवर फार उशीर झाला होता. प्रत्यक्षदर्शींनी बेदरे कुटुंबियांना ही दुःखद वार्ता दिली. एन तारुण्यात प्रभू गेल्याने बेदरे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे, तर बठाण गावात शोककळा पसरली आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज