मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
मंगळवेढा तालुक्यातील तलसंगी परिसरातील कुरण ठिकाणी दिवसाढवळ्या बिबट्या फिरत असल्याने शेतकरी शेतमजूर शालेय विद्यार्थी यांनी बिबट्यांंची दहशत घेतल्याने संपूर्ण परिसर भीतीच्या सावटाखाली वावरत आहे .
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 7588214814
तलसंगी परिसरात गेल्या तीन दिवसांपूर्वी बिबट्या दिसल्याचे बोलले जात आहे. दोन शेतकऱ्यांनी बिबट्याला प्रत्यक्ष पाहिल्याचे सांगत असून बिबट्याने आत्तापर्यंत कोणालाही हानी पोहचवलेली नाही.
कुरण वस्तीवरील बाईडाबाई धनाजी मेटकरी यांनी शेतात काम करीत असतात दुपारी ४ च्या सुमारास त्यांना बिबट्याचे दर्शन झाले होते.शेतात काम करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांनी गावाकडे धाव घेतली.तसेच प्रकाश हतगल यांनी पहाटे २ च्या सुमारास कुत्री भूकत आहेत म्हणून घराबाहेर येऊन पाहिले असता ऊसाच्या कडेला यांनाही या बिबट्याचे दर्शन झाले आहे.
ग्रामस्थांनी वनविभागाकडे बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी केली होती. संबंधित विभागाने याची दखल घेत तलसंगी परिसरात पिंजरा लावला.बिबट्याच्या खुणा आढळून आल्या नसल्या तरी शेतकरी मात्र बिबट्याच्या दहशतीमुळे हादरून गेले आहेत.या भागात बिबट्या नसावा, बिबट्यासदृश तरस असावा असाही अंदाज व्यक्त केला जात आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज