मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
मागील काही दिवसापासून मंगळवेढा शहरातील व तालुक्यातील काही भागात चोरट्यांचा धुमाकूळ सुरू असून रात्री-बेरात्री चोरटे दरवाजे-खिडक्या तोडून घरात घुसून चाकू,धारदार शस्त्राचा धाक दाखवून नागरिकांना धमकावत आहेत. रोकड सोन्यासह ऐवज लुटून नेत असून या घटनेमुळे नागरिकांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली आहे.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 7588214814
सध्या थंडीचे दिवस असल्याने भुरट्या चोरांनी मंगळवेढा शहरात अक्षरशः धुमाकूळ घातला असून गल्लीबोळातील घर आणि लक्ष्य करण्यास सुरुवात केल्याने नागरिकांत घबराटीचे वातावरण आहे.
मंगळवेढा शहरातील शिक्षक कॉलनी व वीरशैव मंगल कार्यालयाच्या पाठीमागे राहणारे लेंडवे सर यांच्या घरात चोरीचा परयत्नाने दरवाज्या जवळ आलेवर आवाज आला,घरातील लोक ऊटले व आरङा ओरङा फोन केल्यावर पळाले. तर दुसरीकडे रविवारी पहाटे १.४५ च्या सुमारास माळी गल्ली येथे चार अज्ञात चोरटे आले होते एका घरात प्रवेश करण्याच्या प्रयत्नात ते घराच्या मागच्या बाजूस गेले. परंतु तिथे जाळी लावली असल्याने त्यांना आत जाता आले नाही तितक्यात घरमालक जागे झाले व त्यांनी लाईट लावल्यानंतर त्यांना सदरचे चोरटे निदर्शनास आले व त्यांनी परिसरातील नागरिकांना फोन करून बोलावून घेतल्यानंतर लोक जागे झाल्याचे पाहून त्या भुरट्या चोरांनी धूम ठोकली.
मंगळवेढ्यात या परिसरातील पाचवी घटना आहे तरीही चोरटे सापडत नाहीत सदरचे चोरटे हे गावातीलच भुरटे चोर असून दिवसा पाळत ठेवून ते रात्री चोरी करत असतात.पोलीसांची गस्त मुख्य रस्त्यावरून चालते. त्यावेळेस गाडीची लाईट व सायरनचा आवाज आयकून चोरटे आडोशाला लपतात व गाडी गेल्यानंतर पुन्हा ते सक्रिय होतात.
पोलिसांनी शहरात ठिकठिकाणी ग्राम संरक्षक दलाची स्थापना करून गस्त वाढवली पाहिजे तसेच नागरिकांमध्ये संरक्षणासाठी जनजागृती करून जे रात्रीच्या वेळी संशयास्पद फिरताना आढळतात अशांना ताब्यात घेऊन चौकशी करून त्यांच्यावर कारवाई केल्यास अनेक चोरी उघडकीस येण्याची शक्यता आहे.
गेल्या काही दिवसांपासून मंगळवेढा शहरात व तालुक्यात घरफोड्यांचे सत्र चालू आहे. या सर्व गोष्टीवर पोलीस अधिकाऱ्यांच्या कुठल्याच प्रकारे वचक राहिला नाही. त्यामुळे ‘आंधळं दळतं कुत्र पिठ खातंय’ अशी अवस्था सध्या पोलिस ठाण्याची झाल्याची चर्चा सर्व तालुक्यातून सुरू आहे. दिवसेंदिवस मंगळवेढा शहरात घरफोड्या,अवैध धंदे कमी होण्याऐवजी वाढत चालले आहेत. त्यामुळे याचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना होत असून शहरातील अवैध धंदे कधी बंद होणार असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.
मंगळवेढा तालुक्यात व शहरात काही भागात चोरट्यांचा धुमाकूळ सुरू असल्याने या चोऱ्याना पायबंद घालावा तसेच चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी येथील नागरिक करीत आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज