मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
मंगळवेढा तालुक्यातील सलगर (बु) येथील मयत डॉ.आनुराधा बिराजदार हिच्याशी प्रेम विवाह केलेल्या श्रीशैल्य चन्नाप्पा बिराजदार (रा.डोमनाळ जि.विजापूर) याच्या शरीरात शवविच्छेदनात विष आढळले त्याने स्वतः विष पिला की अन्य कोणी विष पाजले ? या बाजूने पोलिस तपास करीत आहेत. पोलिसांनी विषाची बाटली ताब्यात घेतली असून या बाटलीवर असलेले ठसे तपासल्यानंतरच या मृत्यूमागील गूढ उकलण्यास मदत होणार आहे.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 7588214814
प्रेम विवाह केलेल्या श्रीशैल्य बिराजदार चा मृतदेह रविवारी दि.९ डिसेंबर रोजी सलगर बुद्रुक येथे पत्नी अनुराधा बिराजदार हिच्या अंत्यसंस्कार करण्यात आलेल्या त्या ठिकाणाजवळ मिळून आला होता. पोलिसांनी श्रीशैल्यच्या मृतदेहाचे इनकॅमेरा शिव विच्छेदन केले असून व्हीशेरा राखून ठेवला आहे. शरीरामध्ये संपूर्ण विष पसरले होते. त्यामुळेच त्याचा मृत्यू ओढावला आहे. हे विष नेमके कुठले आहे हे मात्र प्रयोगशाळेतील तपासणी नंतर समजणार आहे. श्रीशैल्यच्या शरीरावरती कुठल्याही प्रकारच्या जखमा आढळून आल्या नसल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.
मृत श्रीशैल्यच्या पाठीवर काळी बॅग होती या बागेत पाण्याची बाटली व इतर साहित्य पोलिसांना मिळून आले. पोलीस मोबाईल लोकेशनवरून गुन्ह्याचा शोध घेत आहेत. मृतदेहाच्या थोड्याच अंतरावर मोटरसायकलच्या टायरचे खुणा पोलिसांच्या निदर्शनास आल्या असून त्या बाजूनेही तपास केला जात आहे. मयत श्रीशैल्य याचे आई वडील मागील दीड महिन्यापासून ऊसतोडीला गेल्याने त्याच्या कुटुंबातील सदस्यांशी प्रत्यक्ष संपर्क आला नाही. मात्र तो मोबाईल वरून संपर्कात असल्याचे सांगण्यात आले.त्याचा एक भाऊ बेंगलोर येथे वाहनचालक असून तो घटनेच्या अगोदर गावी आला होता. त्यावेळेस त्याने मोबाईलवरून संभाषण केले होते.
मयत श्रीशैल्य हा एका खाजगी कंपनीत नोकरी करत असल्याचे पोलीस तपासात पुढे आले असून पोलीस सदर ठिकाणी जाऊन तेथील कंपनीचा मालक व कामगाराचे जवाब नोंदविणार असल्याचे सांगण्यात आले. या जबाबानंतर तो कधीपासून गायब झाला हे स्पष्ट होणार आहे. सध्या कुटुंबातील आई वडील व भाऊ यांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत. या घटनेचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक महेश विधाते हे करीत आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज