टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा तालुक्यात असलेल्या पंतप्रधान किसान योजनेत गैरप्रकार झाल्याच्या तक्रारीवरून तहसीलदार स्वप्नील रावडे यांनी या योजनेच्या चौकशीसाठी एक सदस्यीय समिती नेमून चौकशीस प्रारंभ केला आहे.
मंगळवेढा तालुक्यात जवळपास ४९ हजार २१३ इतके शेतकरी हे पंतप्रधान किसान योजनेस पात्र आहेत.उर्वरीत २६४० शेतकऱ्यांच्या कागदपत्राच्या त्रुटीमुळे ते या लाभापासून दूर आहेत.
पंतप्रधान किसान योजनेत ज्यांच्या नावावर एक गुंठाही शेती नाही असे बोगस शेतकरी या योजनेच्या तक्रारीवरून तहसीलदार स्वप्नील रावडे यांनी याची दखल घेत तात्काळ निवासी नायब तहसीलदार सुधाकर मागाडे यांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्यीय समिती नेमली आहे.
तालुक्यात सात मंडल असून या मंडलमधील सर्कल व तलाठी पंतप्रधान किसान योजनेची कसून पडताळणी करीत आहेत.
काही खाजगी एजंटामार्फतही पैसे घेवून नावे समाविष्ठ केल्याच्या तक्रारी आहेत.पंतप्रधान किसान योजनेचे लाभार्थी निवडतेप्रसंगी तलाठी,ग्रामसेवक,कृषी सहाय्यक यांची गावपातळीवर ग्रामस्तरीय समिती नेमण्यात आली होती.
यामधून या योजनेचे लाभार्थी निवडण्यात आले आहेत शासकीय सेवेतील चतुर्थ श्रेणीतील कर्मचारी वगळता अन्य कर्मचाऱ्यांना म्हणजेच एक लाखाच्या पुढे उत्पन्न असणाऱ्यांना यामध्ये सहभागी होता येत नसल्याचे सांगण्यात आले.
एजंट आढळल्यास गुन्हे दाखल करणार
पंतप्रधान किसान योजनेच्या कामात एजंट आढळल्यास गुन्हे दाखल करणार आहे.पंतप्रधान किसान योजनेत पात्र शेतकऱ्यांनीच लाभ घेतला आहे. कोणत्याही बोगस शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतलेला नाही. –स्वप्नील रावडे , तहसीलदार
If an agent is found in the work of the Prime Minister’s Kisan Yojana, now the crime will be filed; A one-member committee appointed to investigate
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज