टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये कोरोना वाढीचा वेग कमी जास्त होत आहे आज 237 जणांची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे.त्याचबरोबर आज कोरोनामुळे सहा जणांचा मृत्यू झाला आहे. आजच्या दिवशी 366 जणांना कोरोनामुक्त झाल्याने घरी सोडण्यात आले आहे.
आज दोन हजार 370 जणांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी दोन हजार 133 जणांचे अहवाल निगेटिव्ह 237 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये आतापर्यंत बाधितांची संख्या 27 हजार 177 एवढी झाली आहे तर कोरोनामुळे 747 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाबाधित झाल्यामुळे अद्यापही चार हजार 929 जण वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. 21 हजार 511 जणांना कोरोनामुक्त झाल्याने घरी सोडले आहे.
आज ‘या’ गावातील सहा जणांचा मृत्यू
तहसील कार्यालयाजवळ माळशिरस येथील 60 वर्षाची महिला, कोंढारपट्टा (ता. माळशिरस) येथील 76 वर्षाची महिला, रेल्वे कॉलनी मोहोळ येथील 60 वर्षाचे पुरुष, औराद (ता. दक्षिण सोलापूर) येथील 75 वर्षाचे पुरुष, भाळवणी (ता. पंढरपूर) येथील 35 वर्षाचे पुरुष, आजोती (ता. पंढरपूर) येथील 60 वर्षाचे पुरुष यांचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
सोलापूर शहरात 77 नवे कोरोना बाधित आढळले
सोलापूर महापालिका हद्दीत बुधवारी रात्री बारा वाजेपर्यंत कोरोना चाचण्यांचे 756 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यापैकी 679 अहवाल निगेटिव्ह आले असून 77 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
कोरोनामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचेही या अहवालातून स्पष्ट झाले आहे. कोरोना मुक्त झालेल्या 16 जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. महापालिका हद्दीतील एकूण बाधितांची संख्या आता 8 हजार 862 झाली आहे.
आज नव्याने सापडलेल्या बाधितांमध्ये आशियाना नगर, नवी पेठ, मजरेवाडीतील ज्ञानेश्वर नगर, टेलिग्राफ हौसिंग सोसायटी, विजापूर रोडवरील मंत्री चंडक पार्क, मंगळवार बाजार जवळ, बाळे, रेल्वे लाइन्स येथील विद्याविहार अपार्टमेंट, वसंत विहार सोसायटी, होटगी रोड वरील आनंदनगर, सैफूल येथील अनुपम पार्क, बाळे येथील संतोष नगर, मुरारजी पेठेतील धमश्री लाईन, जुळे सोलापुरातील वानकर नगर, दाजी पेठ, अवंती नगर, दक्षिण कसबा येथील इंद्रायणी अपार्टमेंट,
तर मुरारजी पेठेतील यश नगर, होटगी रोड वरील जय बजरंग नगर, मजरेवाडीतील टिळकनगर, कुमठा नाका येथील विष्णू गोपाळ नगर, निर्मिती विहार येथील महालक्ष्मी नगर, रामलाल चौक, मुरारजी पेठ, कुमठा नाका, मुरारजी पेठ येथील गोकटे चाळ, मौलाली चौक, शोभा देवी नगर, शेळगी येथील सुंदर नगर, कविता नगर, कुमठा नाका येथील संजयनगर, पोलिस मुख्यालयाजवळ, जुळे सोलापुरातील बॉम्बे पार्क जवळ, महादेव नगर, हत्तुरे वस्ती येथील स्वामी विवेकानंद नगर, पुना नाक्याजवळील मडके वस्ती येथील योगीराज नगर, आर्य चाणक्य नगर,
तर शेळगी येथील सिध्दम्मानगर, बापुजी नगर, घरकुल रोड येथील जमादार वस्ती, शेळगी येथील सिद्धेश्वर नगर, गंगाराम गल्ली येथील विजय नगर, जुना अक्कलकोट नाका येथील वज्रेश्वरी नगर, बाळ्यातील कागद कारखान्या जवळ, अक्कलकोट रोडवरील सुनील नगर, भद्रावती पेठ, लक्ष्मी अपार्टमेंट, दीक्षित नगर भाग 3, कुमठा नाका येथील अंबिका नगर, पश्चिम मंगळवार पेठेतील बलिदान चौक, गांधीनगर येथील आनंद विणकर सोसायटी, नई जिंदगी येथील शिवगंगानगर, कुमठा नाका येथील जीवन विकास नगर, सिध्देश्वर मार्केट यार्ड जवळ, विजापूर रोडवरील कोळी समाज सोसायटी, विजापूर रोड या ठिकाणी नव्याने कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.
Solapur rural 366 corona free 237 new corona positive, six deaths
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज