मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा :-
मंगळवेढा तालुक्यातील नंदूर येथील फॅबटेक साखर कारखाना येथे लहू नात्याबा मुंढे वय.३५ (रा.येवला ता.केज जि.बीड) या ऊसतोड कामगाराने राहत्या कोपीत अज्ञात कारणावरून गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की मयत लहू मुंढे याने शनीवारी दिनांक २६ जानेवारी रोजी पहाटे ३.३० च्या सुमारास फॅबटेक कारखाना परिसरात कोपीत त्याने आडव्या बांबूला मफलरच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज