नगरसेवक स्वार्थापोटी त्रास देत असल्याचा नगराध्यक्षांचा आरोप
मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
मंगळवेढा नगरपालिकेच्या नगराध्यक्षा अरुणा माळी ह्या आपल्या पदाचा दुरुपयोग करीत असल्याचा आरोप करीत , उपनगराध्यक्ष चंद्रकांत घुले , अजित जगताप यांच्यासह ११ नगरसेवकांनी माळी यांच्याविरूध्द जिल्हाधिका – यांकडे विश्वास ठराव दाखल केला आहे.
मंगळवेढा नगरपालिकेत राजकीय वाद विकोपाला गेला आहे.गेल्या काही दिवसांपासून सत्ताधारी गटातील नगराध्यक्ष व माजी पक्ष नेते अजित जगताप यांच्यात वाद सुरू असून नगरपालिकेत एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न सातत्याने सुरू आहे.
दि.२७ रोजी अजित जगताप , उपनगराध्यक्ष चंद्रकांत घुले,प्रवीण खवतोडे,संकेत खटके,राजश्री टाकणे, सबजपरी मकानदार,सुमन शिंदे,रामचंद्र कोंडभैरी,रतन पडवळे,लक्ष्मी म्हेत्रे,निर्मला माने या ११ जणांनी जिल्हाधिकारी यांच्यासमोर जाऊन नगराध्यक्षा माळी यांच्याविरोधात च्यात तक्रार देत पदावरून काढण्याची मागणी केली आहे.
स्वछता अभियान,सुवर्ण जयंती नगरोथान योजना व इतर विकास तीन कामांच्या प्रमाणकावर कोणतेही कारण नसताना सह्या न करणे , विविध योजनेच्या कामाच्या १३ निविदा कमी दराच्या निविदा मुख्याधिका – यानी मंजूर करूनही त्या निविदा नामंजूर करीत फेरनिविदा मागवण्याच्या शिफारशी करून निधी आखर्चित पाडला आहे.
स्थायी समितीच्या इतिवृत्तावर गेली तीन महिने सह्या न केल्याने निधी खर्चाचे नियोजन कोलमडले असून विकास कामे माळी अनेच्या रखडली आहेत.
नगरपालिकेत आ .भारत भालके व राहुल शहा यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस – राष्ट्रवादीची सत्ता असली तरी गेल्या काही दिवसापासून पक्षनेते अजित जगताप यांचे नेतृत्वाशी बिनसल्याने आ. प्रशांत परिचारक यांच्या संपर्कात गेले आहेत.
अरुणा माळी ह्या सोलापूर जिल्ह्यातील एकमेव राष्ट्रवादीच्या नगराध्यक्षा आहेत . मंगळवेढा नगरपालिकेतील गेल्या काही वर्षातील अविश्वास ठराव दाखल करण्याची ही चौथी वेळ आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज