मंगळवेढा टाईम्स ऑनलाईन । आजपासून सुरू होत असलेल्या आयपीएल स्पर्धेचा सलामीचा सामना रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्स व महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात रंगणार आहे. या सामन्यात मुंबईला वेगवान गोलंदाज लसित मलिंगाची तर, चेन्नईला सुरेश रैनाची उणीव भासणार आहे. IPL’s ‘vaccine’ from today; A feast of eight teams, 53 days and 60 matches
मात्र, याहीपेक्षा मोठे आव्हान असेल ते उष्ण वातावरण व येथील मैदानावरच्या नव्या कोऱ्या खेळपट्टीचे. IPL opening match between Mumbai Indians and Chennai Super Kings will be played today
मॅचफिक्सिंगच्या प्रकरणानंतर भारतीय संघ आखातात मुळातच गेल्या 10 वर्षांपेक्षाही जास्त काळ खेळलेला नाही. त्यामुळे परदेशी खेळाडूंप्रमाणे भारतीय खेळाडूंनाही येथील खेळपट्टीचा अभ्यासच करता आलेला नाही. दोन्ही संघांनाही याचा फायदा-तोटा समानच होणार आहे.
अर्थात, रोहित शर्मा व धोनी यांच्यासारख्या खेळाडूंना स्थिरावण्यास वेळ लागत नाही.मार्चमध्ये होणारी ही स्पर्धा यंदा करोनाच्या धोक्यामुळे लांबणीवर टाकली गेली व आता आखातात हा धोका कमी असल्याने सुरक्षेची संपूर्ण काळजी घेत सुरू होत आहे.
या स्पर्धेसाठी सर्व संघांचे खेळाडू येथे दाखल झाल्यावर सुरुवातीला काही दिवस विलगीकरणात राहिले व त्यानंतर त्यांचा सराव सुरू झाला.
चेन्नई संघातील दीपक चहर व ऋतुराज गायकवाड या दोन खेळाडूंसह सपोर्ट स्टाफमधील काही सदस्य मिळून एकूण 13 जणांना करोनाची बाधा झाली होती. त्यातून ऋतुराज वगळता सर्व जण करोनातून मुक्त झाले. त्यानंतर चेन्नई संघाचा सरावही सुरू झाला. त्यात धोनीसह सर्व खेळाडू पूर्ण तंदुरुस्त असल्याने मुंबईसमोर त्यांची फलंदाजी कशी रोखायची याचेच आव्हान राहणार आहे.
मुंबईचा स्टार गोलंदाज लसित मलिंगा याची उणीव प्रकर्षाने जाणवणार आहे. तोच त्यांच्याकडून या स्पर्धेच्या इतिहासातील सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला आहे. अर्थात, भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह, नाथन कुल्टरनाइल व अष्टपैलू कॅरन पोलार्ड यांच्याकडून सरस कामगिरीची अपेक्षा आहे.
कॅरेबियन लीगमध्ये पोलार्डने सातत्यपूर्ण खेळ केल्याने त्याला कसे रोखायचे हा चेन्नईसमोरचा मोठा प्रश्न राहणार आहे.
सामन्याची वेळ
सायंकाळी : 7ः30 (भारतीय प्रमाण वेळेनुसार) , ठिकाण : आबूधाबी, थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्टसवर.
प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय
सामना आबूधाबीत आहे. त्यातच येथे सध्या खूप उष्ण वातावरण आहे. त्यामुळे दुसऱ्या डावात गोलंदाजी करताना दवाचा फरक पडणार आहे.
त्यामुळे गोलंदाजांना चेंडू ग्रीप करताना त्रास होणार असल्यामुळे जो संघ नाणेफेक जिंकेल तो प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेण्याची शक्यता जास्त आहे.
धोनीचा खेळ पाहण्यासाठी करोडो चाहते आतुर
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या महेंद्रसिंग धोनीला पाहण्यासाठी मैदानाबाहेर तुफान गर्दी होत आहे. ही स्पर्धा पार पडल्यानंतर धोनी थेट पुढील वर्षीच आयपीएल स्पर्धेत खेळताना दिसणार असल्याने त्याचा खेळ पाहण्यासाठी करोडो चाहते थेट प्रक्षेपणाची आतूरतेने वाट पाहात आहेत.
प्रेक्षकांना मैदानात मनाई
करोनाचा धोका जगभरात अद्याप कायम असल्याने या स्पर्धेतील सामने पाहण्यासाठी प्रेक्षकांना मैदानात प्रवेश देण्यात येणार नाही. अर्थात, स्पर्धेच्या नंतरच्या टप्प्यात कोरोनाचा धोका संपुष्टात आला तर त्याबाबत निर्णय घेतला जाईल, असे मत बीसीसीआय, अमिराती क्रिकेट मंडळ व अमिराती सरकारने व्यक्त केले आहे.
IPL opening match between Mumbai Indians and Chennai Super Kings will be played today
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज