mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

विधानसभेसाठी एक संधी द्या;मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलून दाखवतो : प्रा. शिवाजीराव काळुंगे

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
विधानसभेसाठी एक संधी द्या;मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलून दाखवतो : प्रा. शिवाजीराव काळुंगे

मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-

विधानसभेसाठी एक संधी द्या; पंढरपूर – मंगळवेढा तालुक्याचा विकासाच्या माध्यमातून चेहरामोहरा बदलून दाखवतो असे मत काँग्रेसचे अधिकृत उमेदवार प्रा. शिवाजीराव काळुंगे यांनी केले आहे.विधानसभा निवडणूकीनिमित्त मंगळवेढा तालुक्यातील अकोला, गणेशवाडी, शेलेवाडी, आंधळगाव, लेंडवे चिंचाळे, शिरसी, जुनोनी, खुपसंगी, पाठखळ, कचरेवाडी, 

व मंगळवेढा येथे शनिवार पेठ व शिवाजी तालिम 

आदी गावभेटीचा दौरा रविवार दि.13 ऑक्टोबर रोजी करण्यात आला. याप्रसंगी काँग्रेसचे उमेदवार प्रा.काळुंगे बोलत होते.

प्रा.शिवाजीराव काळुंगे म्हणाले, समाजकारण आणि राजकारण हे जनहितासाठी असावे. जनता हीच आपल्यासाठी सार्वभौम आहे. जनतेचा सर्वांगीण विकास हा आपला मुद्दा असून हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवून पुढे काम करत आलो आहे.

दूरदृष्टी ठेऊन मंगळवेढा व पंढरपूर तालुक्यात आर्थिक सहकार चळवळीसाठी धनश्री महिला व धनश्री मल्टीस्टेटची स्थापना केली. या माध्यमातून अनेक गरजूंना आर्थिक भांडवल उभा करून त्यांची गरज पूर्ण केली.स्वयंसहायता बचत गटातून महिलांना स्वावलंबी करण्याचा उद्देश ठेवूनच धनश्री परिवाराने बचतगटांच्या सुप्त क्रांतिकारी चळवळीत पुढाकार घेवून महिलांना सक्षम करण्यासाठी प्रयत्न केले. 

मंगळवेढा तालुक्याचा दक्षिण भाग हा गेल्या अनेक वर्षांपासून दुष्काळी भाग आहे. 

पाणी परिषदेच्या माध्यमातून मी गेल्या अनेक वर्षांपासून या भागाला पाणी मिळावे म्हणून प्रयत्नशील आहे. ज्या दुष्काळी भागांना पाणी मिळण्यासाठी पाणी परिषदेची स्थापना करण्यात आली . त्या त्या सर्व भागांना तालुक्यांना कमी अधिक प्रमाणात पाणी येऊन न्याय मिळाला आहे. पण मंगळवेढा तालुक्याला मात्र आजपर्यंत पाणी येऊ शकले नाही म्हणून आम्ही गतवर्षी मंगळवेढा येथे पाणी परिषद आयोजित करून सुमारे ८० हजार शेतकऱ्यांना एकत्रित केले . तसेच हुन्नुर येथे १० हजार शेतकऱ्यांच्या उपस्थितीत विभागीय पाणी परिषद घेतली. म्हणूनच मंगळवेढा तालुक्याच्या इतिहासात पहिल्यांदाच हुन्नूरच्या ओढ्यात म्हैसाळचे पाणी बघायला मिळाले. 

म्हैसाळचे पाणी होऊन अशा ओढ्यात पोहोचल्यानंतर पाणी पूजन करण्यासाठी अनेकांनी संधी साधली. पण म्हैसाळचे पाणी मंगळवेढ्यात येण्यासाठी आमचा लढा अनेक वर्षापासून सुरू आहे हे सर्वांनाच माहित आहे. मंगळवेढा व पंढरपुरात काँगेसची चांगली ताकद आहे धनश्री परिवाराच्या माध्यमातून हजारो लोक जोडले आहेत. त्यामुळे पंढरपूर विधानसभा मतदार संघावर मंगळवेढ्याला प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळावी अशी सर्वसामान्य लोकांची भावना आहे तसेच मी आजवर काँगेस पक्षाचा सामान्य कार्यकर्ता म्हणून पक्षवाढीसाठी प्रामाणिकपणे व निष्ठेने केलेले कार्य कामी येणार आहे.

मंगळवेढा तालुका स्वातंत्र मिळाल्यापासून आज तागायत काँगेसच्या विचाराचा राहिला आहे. 1967 व 1972 पंचवार्षिक वगळता 2009 पर्यत मतदार संघ राखीव असल्याने व मतदारसंघ खुला झाल्यानंतर तालुक्याला बाहेरून आलेले नेतृत्व लाभले आहे परंतु आता आपण मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी व मतदारसंघातील रखडलेली विकसाकामे, 35 गाव पाणीप्रश्न, रस्ते, पिण्याचे पाणी यांसारखे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध आहे. 

आपण कायम जनतेच्या सानिध्यात असल्याने जनतेचे सर्व प्रश्न त्यांची सुख दुःखे माहीत आहेत आपणाला या मतदारसंघातून संधी मिळाल्यास प्राधान्याने मंगळवेढ्याच्या नशीबी असलेला शेकडो वर्षाचा दुष्काळ हटविण्यासाठी पाणीप्रश्न मार्गी लावून शेतकऱ्यांच्या जीवनात बदल घडवू शकतो. यासाठी आपल्या हातात सत्ता असणे आवश्यक आहे. ही सत्ता मतदारांनी द्यावी असे त्यांनी यावेळी आवाहन केले.

याप्रसंगी उस्मानाबाद जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा डॉ.राजलक्ष्मी काळुंगे-गायकवाड, विठ्ठल काळुंगे, वसंत गरंडे , अक्षय टोमके, परमेश्‍वर घुले, शिवाजी काळे आदीनी आपले मनोगत व्यक्त केले.

विविध गावातील संस्थेचे पदाधिकारी, प्रतिष्ठित नागरिक, सरपंच, उपसरपंच, कार्यकर्ते व मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

सोमवार दि. 14 ऑक्टोबर रोजी निवडणूकीच्या प्रचारार्थ डोंगरगाव, हाजापुर, जालिहाळ, सिध्दनकेरी, रड्डे, नंदेश्वर, खडकी, पडोळकरवाडी, लोणार, महमदाबाद हु, मानेवाडी, रेवेवाडी, हुन्नूर, भोसे या ठिकाणी सभा आयोजित केल्या आहेत.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
अखिल भारतीय छावा संघटनेचा अपक्ष उमेदवार समाधान आवताडे यांना पाठिंबा

अखिल भारतीय छावा संघटनेचा अपक्ष उमेदवार समाधान आवताडे यांना पाठिंबा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विद्यापीठाची पोलिसात धाव, अंतिम परीक्षेवर सायबर अटॅक

कामाची बातमी! व्हॉट्सअपवर लग्नाची पत्रिका अन् धोका, तुमचं बँक अकाऊंट होऊ शकतं रिकामं; सायबर पोलिसांकडून महत्त्वाचं आवाहन

May 31, 2026
महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

शेतकऱ्यांनो! सरकारने दिली बळीराजांची चिंता वाढविणारी अपटेड; मान्सून लांबणार, पेरणीची घाई करू नका…

May 31, 2026
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पांडुरंग परिवाराकडून गावोगावी बैठकांचे सत्र सुरू; विधानसभेसाठी मोर्चेबांधणी की…; कार्यकर्त्यांकडून असा आग्रह

सोलापूर विधानपरिषदेत भाजपचा मोठा डाव; प्रशांत परिचारकांना डावलून राजेंद्र राऊतांना उमेदवारी, परिचारक गट नाराज?

May 31, 2026
‘चांगले दिवस येणार होते, पण तू सोडून गेलीस…’ रीलस्टार रोहिणी पारध्ये आत्महत्येप्रकरण; पतीची पहिली पोस्ट चर्चेत, नेमके कारण काय?

‘चांगले दिवस येणार होते, पण तू सोडून गेलीस…’ रीलस्टार रोहिणी पारध्ये आत्महत्येप्रकरण; पतीची पहिली पोस्ट चर्चेत, नेमके कारण काय?

May 31, 2026

तरुणांनो सावधान! बॉडी फुगवण्यासाठी वापरले जाणारे घातक इंजेक्शन विकणारे रॅकेट जेरबंद; २ लाखांचा मुद्देमाल जप्त; सोलापूर जिल्ह्यात अवैध नशिल्या इंजेक्शनचा काळा बाजार उघड

May 31, 2026
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

जमिनीच्या तुकड्यासाठी कोर्टाची पायरी चढणाऱ्यांनी एकदा वाचाच; वडिलांच्या निधनानंतर मुलांनी घराच्या अंगणातच केलं असं काही पंचक्रोशीतून होतंय प्रचंड कौतुक

May 31, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा