
मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
मंगळवेढा तालुक्यातील रखडलेल्या प्रश्नांसाठी, बेरोजगारी हटवण्यासाठी व तालुक्याच्या उन्नतीसाठी प्रयत्न करणारे समाधान आवताडे यांचे हात बळकट करण्यासाठी अखिल भारतीय छावा संघटनेने पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे अपक्ष उमेदवार समाधान आवताडे यांना जाहीर पाठिंबा देऊन त्यांच्या विजयासाठी प्रयत्न करणार असल्याचे छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष नागेश गायकवाड यांनी सांगितले.

यावेळी खरेदी-विक्री संघाचे चेअरमन सिद्धेश्वर आवताडे,शैलेश अवताडे,उपसरपंच दत्तात्रय तोडकरी उपस्थित होते .
यावेळी अवताडे गटांमध्ये अखिल भारतीय छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष नागेश गायकवाड,जिल्हा संघटक मनोज चव्हाण, तालुकाध्यक्ष सुरज फुगारे, विद्यार्थी आघाडीचे तालुकाध्यक्ष अक्षय पवार, युवक तालुकाध्यक्ष बालाजी भोजने, वाहतूक आघाडी चे तालुकाध्यक्ष नागेश नरोटे ,शहराध्यक्ष सागर वाघमारे ,युवक शहराध्यक्ष वैभव ठेंगील यांचेसह सागर वाघमारे, प्रशांत नकाते ,दादा पोफळकर, सागर रणदिवे, अरुण मेटकरी ,अनिल चव्हाण, दत्ता सरडे, तेजस चव्हाण, अक्षय इंगळे ,शशिकांत पवार ,रोहित बसणाळे,उमेश आवताडे,अनिल मुदगुल,सोमनाथ सावंजी, कुमार सावंत,गणेश सावंजी,युवराज वाघमोडे, नवनाथ माने,नवनाथ ताटे,बबलू उन्हाळे,सोन्या मुदगुल,प्रमोद सावंजी व इतर बहू संख्येने छावा कार्यकर्ते उपस्थित होते.





बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज













