टीम मंगळवेढा टाईम्स । महाविद्यालयात शिकणाऱ्या २१ वर्षीय तरूणीस लग्नासाठी आग्रह धरून तिच्या घरासमोर हॉर्न वाजवून वडिलांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी अजित बाळू नागणे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
याप्रकरणी पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तालुक्यातील बठाण येथील २१ वर्षीय तरुणी शिक्षणासाठी मंगळवेढ्यास येत असून येथील आरोपी अजित याने २०१८ पासून,
मोटर सायकलवरून पाठलाग करून तू माझ्याशी लग्न करते का असे विचारून तिच्या अंगावर मोबाईल टाकून या मोबाईलवर माझ्याशी बोल तसेच तिच्या घरासमोर उभे राहून गाडीचा हॉर्न वाजवून वडिलांना फोन करून जीवे मारण्याची धमकी दिली.
मुलीचे सुस्ते (ता.पंढरपूर),लोहगाव (ता.जत) येथे जमलेले लग्न त्या नातेवाईकांना फोन करून सदर तरुणीशी माझे प्रेमसंबंध आहेत. आम्ही दोघे लग्न करायचे असे खोटे सांगून मोडले आहे.
Mangalwedha Crime against youth for threatening to kill the girl’s father
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज