

मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
तीन महिलांचे बेकायदा गर्भपात केल्याप्रकरणी डॉ.श्रीकांत मर्दा (वय ६७) , प्रकाश गोडसे (वय ३५ , रा .गोपूज , जि .सातारा) , अमोल काशिद (वय ३०, रा . वाढेगाव ) या तिघांना पोलिसांनी अटक करून सांगोला न्यायालयात उभे केले असता त्यांना पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.

मंगळवेढा येथे मर्दा नर्सिंग होम व एक्स – रे क्लिनिक दवाखाना असून तीन महिलांचे अवैधरीत्या गर्भपात करण्यात आल्याच्या माहितीवरून पोलीस व तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दवाखान्यावर छापा टाकला होता.
पोलीस निरीक्षक अनिल गाडे यांनी तीन आरोपींना अटक करून रविवारी दुपारी सांगोला न्यायालयात उभे केले. यावेळी राज्यात गर्भपाताला बंदी आहे , हे प्रकरण गंभीर असल्यामुळे सखोल चौकशी करण्यासाठी सात दिवसाच्या पोलीस कोठडीची मागणी केली . त्यावर न्यायालयाने १७ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.





बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज












