mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

समस्यांच्या विळख्यात सापडलेल्या जनतेला बाहेर काढणार : समाधान आवताडे

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
समस्यांच्या विळख्यात सापडलेल्या जनतेला बाहेर काढणार : समाधान आवताडे

मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-

पंढरपूर-मंगळवेढा मतदारांघातील जनता समस्यांच्या विळख्यात भरडली जाऊन आश्वासनाच्या खोल गर्तेत बुडालेली आहे, या परिस्थिला केवळ लोकप्रतिनिधी जबाबदार असून ही परिस्थिती बदलायची असेल तर लोकप्रतिनिधी बदला  सर्व समस्यातून मुक्त करेन असे पआवाहन पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार समाधान आवताडे यांनी केले. ते डोंगरगांव, हाजापूर, जालीहाळ, सिध्दनकेरी, रड्डे, शिरनांदगी, चिक्कलगी, मारोळी, जंगलगी, लवंगी, सलगर बु. या गावांमध्ये आयोजीत केलेल्या प्रचार सभांमध्ये ते बोलत होते.

पुढे बोलताना समाधान आवताडे म्हणाले, काळ कुणासाठी थांबत नसतो. युवकांमध्ये बुध्दीमत्ता आहे पण ती वापरण्याची संधी युवकांना मिळत नाही. या  मतदारसंघाचे तारुण्य वाया गेलं तर पुढची पिढीही अडचणी येणार आहे. गेलेला काळ आपण आणू शकत  नाही पण भविष्य चांगलं घडविणे हे तर आपल्या हातात आहे. यासाठीच पुढील काळात या मतदारसंघामध्ये मला औद्योगीक क्रांती करायची आहे. यासाठीच राजकारणाची मशागत करण्याची वेळ आली आहे. सर्वसामान्यांच्या घरची आर्थिक स्थिती सक्षम होणे गरजेचे आहे. सभासदांनी मोठ्या विश्वासाने त्या विश्वासास पात्र राहूनच कारखान्याचा कारभार करीत आलो आहे. रस्त्याची आश्वासने, पाण्याची आश्वासने, विजेबाबत आश्वासने … किती दिवस आश्वासनावरच जगणार आहोत आपण. पाणी वाटप समितीचे सदस्य असूनही लोकप्रतिनिधींकडून पाणी वाटपाचे नियोजन झालेले नाही. मतदारसंघाच्या समस्या विधानसभेमध्ये व्यवस्थती मांडल्या गेल्या नाहीत. सत्ता विरोधात आहे अशी तकलादू कारणे सांगून आजपर्यंत वेळ मारुन नेण्याचेच काम झालेले आहे. दुष्काळात जन्मलो असलो तरी दुष्काळात आता मरणार नाही. हे चित्र बदलण्यासाठी मला विकासाची नांदी आणायची आहे. या मतदारसंघाला न्याय देण्याचे काम मला करायचे आहे  यासाठी येत्या २१ तारखेला माझे चिन्ह ट्रॅक्टर असणा-या चिन्हाच्या पुढे बटण दाबून परिवर्तनाच्या प्रवाहामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन शेवटी समाधान आवताडे यांनी केले.

याप्रसंगी सभापती प्रदिप खांडेकर,प्रा.येताळा भगत सर, दत्तात्रय जमदाडे सर, पंचायत समिती सदस्या उज्वला मस्के, प्रा.समाधान क्षिरसागर, डॉ.लक्ष्मण हेंबाडे कृष्णदेव नागणे, द-याप्पा कांबळे,बसवंत पाटील, रामचंद्र कोरे, हणमंत कोरे सर, शिवाजी खडतरे, युवराज कांबळे सर, राजकुमार स्वामी, हणमंत तेलगांव आदिनीही मनोगत व्यक्त केले.

या दौ-याचे वेळी जिल्हा परिषद सदस्य दिलीप चव्हाण, मार्केट कमेटी सभापती सोमनाथ आवताडे, दामाजी कारखान्याचे संचालक मारुती थोरबोले, लक्ष्मण नरुटे, रामकृष्ण चव्हाण,माजी उपनगराध्यक्ष चंद्रकांत पडवळे, लक्ष्मण मस्के, सत्यजीत सुरवसे, पिनू आवताडे, सुनिल लोखंडे, बाळासो कवाळे, शंकर मेटकरी, शिवाजी जाधव, गनीम पठाण, बाबा सय्यद, अशोक जाधव, मधुकर मोरे,भारत पाटील, शंकर कोकरे, सुरेश कांबळे, विठठल कोरे,सकलेश कोरे, शिवाजी कोरे,ईश्वराप्पा बिराजदार, अमृत उमराणी, गुरुसिध्दाप्पा हत्ताळी, संगाप्पा हत्ताळी, जनार्धन थोरबोले, विनोद सुतार, डॉ.भिमराव जावीर,उत्तम थोरबोले, सोमनिंग हत्ताळी, भागाप्पा पडवळे, गोपाळ ठोंबरे, निंगोंडा पाटील, रामचंद्र शेंबडे, रामचंद्र पाटील सर,मायाप्पा गावडे, अमृत पाटील, शिवाजी फटे, नामदेव करांडे,किसन हजारे,बापू शिंदे,आप्पासाहेब माने,राम निकम,गफूर पाटील,याकूब पाटील, रईस शेख,मायाप्पा पांढरे,सदाशिव लेंगरे, यांचेसह संबंधीत गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य,सोसायटी चेअरमन, सदस्य, पदाधिकारी, समर्थक, ग्रामस्थ, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.सुत्रसंचालन अशोक उन्हाळे, सचिन माळगे यांनी केले.

प्रहार व वडार समाजाचा पाठिंबा


 या प्रचार दौ-यांमध्ये समाधान आवताडे यांना पाठिंबा देण्याचा धडाका वाढतच असल्याचे दिसून आले. यामध्ये वडार समाज संघटणा,मंगळवेढा चे युवक दत्ता देवकर,संतोष जाधव,रवी मुदगूल,विशाल धोत्रे अक्षय जाधव,उमेश जाधव, आण्णा जाधव, सुरेश जाधव, सागर मुदगूल यांचा समावेश होता.

तसेच प्रहार शेतकरी संघटणेनेही समाधान आवताडे यांना पाठींबा जाहीर करुन प्रवेश केला. यामध्ये प्रहार संघटणेचे तालुका अध्यक्ष राजकुमार स्वामी तसेच अमोगसिध्द काकणकी,महेश तळळे, आप्पाराया काकणकी,रामगोंडा व्हनुटगी,सिध्दाराम कोळी, अरिफ शेख,अल्लाऊददीन शेख,मुन्ना पटेल,रमजान पटेल, तसेच डोणज,कागष्ट, अरळी येथील प्रहार संघटणेच्या असंख्य कार्यकत्यांनी समाधान आवताडे यांना पाठिंबा जाहीर केला. तसेच हाजापूर येथे द-याप्पा कांबळे,जंगलगी येथे चौगुले गट, भागाप्पा चोपडे,सलगर येथे बसवराज पाटील,मल्लीकार्जून पाटील,रविराज पाटील,निलकंठ साखरे, पंडीत मोहिते, अल्लाप्पा सर्जे,लवंगी येथे मा.सरपंच गंगुबाई खांडेकर, रहिन शेख मित्रमंडळ, एसएस ग्रुप लवंगी आदीनी उमेदवार समाधान आवताडे यांना पाठींबा दिला आहे. जाहीर पाठींब्याचा हा ओघ जोमाने सुरु आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
राष्ट्रवादी-काँग्रेसने विकासात्मक काम न करता केवळ गप्पा मारण्याचे काम केले

राष्ट्रवादी-काँग्रेसने विकासात्मक काम न करता केवळ गप्पा मारण्याचे काम केले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खळबळ! सोलापूरात महिलेवर अत्याचारप्रकरणी एका पोलिस निरीक्षकावर गुन्हा दाखल

भिगवण तरुणी अपहरण प्रकरणात नवा ट्विस्ट, तरुणीचा रवानगी सुधारगृहात; आता तरुणाचं काय होणार? तरुणीचे धक्कादायक शपथपत्र

February 21, 2026
मोठी बातमी! उपसा सिंचन योजनेच्या कामाचे निघाले टेंडर; आ.आवताडे यांच्या प्रयत्नामुळे प्रत्यक्षात कामाला लवकरच होणार सुरुवात

शेत आणि पाणंद रस्त्यांसाठी प्रशासकीय हालचालींना वेग; शेतकऱ्यांनी थेट तहसीलदारांशी संपर्क साधण्याचे आवाहन; आमदार आवताडेंचा शेतकऱ्यांच्या हितासाठी पुढाकार

February 21, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

खळबळजनक! दहावीच्या परीक्षेत १० ‘मुन्नाभाई’; तरुणीसह २० जणांवर मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; केंद्र संचालकांच्या सतर्कतेने मोठा रॅकेट उघड

February 21, 2026
देखो चॅंद आया ! जाणून घ्या ‘या’ वर्षातील रमजानमधील सेहरी आणि इफ्तारची भारतातील वेळ

आल्हाददायक! तब्बल ३० वर्षांनी निसर्गाची साथ, फेब्रुवारीत रमजान आल्याने वाढत्या तापमानाची चिंता मिटली; रोजेधारकांसाठी यंदाचा महिना ठरणार सुखद

February 20, 2026
सोलापुरात गोपीचंद पडळकरांनी पुकारलेल्या आंदोलनानंतर ‘धनगर’ समाजाच्या नेत्यांनीच केला संयोजकावर खुनी हल्ला

​सासूचा जीव घ्यायला निघाली, कुंकूच पुसलं गेलं! विषप्रयोग फसला, नराधम पत्नीचा सुसंस्कृत चेहरा बेनकाब; पत्नी, प्रियकराविरुद्ध महिन्यानंतर गुन्हा दाखल

February 20, 2026
​सहकार आणि समाजकारणाचा सुवर्णसंगम म्हणजे स्व.सुभाष शहा; आमदार समाधान आवताडे यांनी जागवल्या आठवणी

​सहकार आणि समाजकारणाचा सुवर्णसंगम म्हणजे स्व.सुभाष शहा; आमदार समाधान आवताडे यांनी जागवल्या आठवणी

February 19, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा