mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

आमदार भारत भालके यांची मंत्रीपदासाठी लाॅटरी लागणार ?

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
आमदार भारत भालके यांची मंत्रीपदासाठी लाॅटरी लागणार ?

मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-

राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काॅंग्रेस असे नवीन सत्ता समिकरण जुळण्याची दाट शक्यता आहे. राज्याच्या राजकारणात असे नवे समिकरण जुळून आले तर राष्ट्रवादीच्या आमदारांची मंत्रीपदासाठी लाॅटरी लागणार आहे. यामध्ये सोलापूर जिल्ह्यातून पंढरपूरचे राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांनी संधी मिळण्याची अधिक शक्यता आहे. शरद पवारांचे अत्यंत विश्वासू आमदार म्हणून भालकेंची ओळख असल्याने त्यांना राज्यमंत्री मंडळात संधी मिळू शकते असा आत्मविश्वास कार्यकर्त्यांमधून व्यक्त केला जात आहे.

बातम्यां व जाहिरातीसाठी संपर्क : 7588214814

राज्यात पुन्हा एकदा भाजप-शिवसेना महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले असतानाही मुख्यमंत्री पदावरुन सत्तेचे घोडे अडले आहे. मुख्यमंत्री पदावरुन भाजप -सेनेमध्ये सत्तासंघर्ष अगदी टोकाला आला आहे. कोणत्याही क्षणी भाजप -सेनेची काडीमोड होण्याची शक्यता आहे.

सत्ता स्थापन करण्यासाठी शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काॅंग्रेसला सोबत घेण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. अशातच शिवसेनेचे संजय राऊत यांनी ही  शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी हा शिवतिर्थावर होणार असल्याचे जाहीर केल्याने शिवसेना-राष्ट्रवादी आणि काॅंग्रेस अशी नवी युती राज्याच्या राजकारणात पहायला मिळेल अशी शक्यता निर्माण झाली आहे.

नवीन सत्ता समिकरण जुळून आले तर राष्ट्रवादी सत्तेत सहभागी होईल. त्यामुळे राष्ट्रवादीच्या आमदारांना मंत्रीपदाची लाॅटरी लागण्याची शक्यता आहे. यामध्ये पंढरपुरातून तिसऱ्यांदा विजयी झालेले राष्ट्रवादीचे आमदार भारत भालकेंना संधी मिळण्याची ही अधिक शक्यता आहे.

सोलापूर जिल्ह्यातून माढा, पंढरपूर, आणि मोहोळ या तिन ठिकाणी राष्ट्रवादीने विजय मिळवला आहे. माढ्यातून आमदार बबनदादा शिंदे हे विजयी झाले आहेत, शिंदे यांचे वयोमान आणि त्यांच्या सततच्या प्रकृतीच्या तक्रारीमुळे त्यांना संधी मिळणे जरा अवघडच आहे. मोहोळ मधून इंदापूरचे यशवंत माने हे विजयी झाले आहेत. माने-शिंदे यांच्यापेक्षा भालकेंचा दबदबा अधिक आहे. शिवाय भारत भालके हे आक्रमक म्हणून ओळखले जातात. भाजपचे उमेदवार सुधाकर परिचारकांचा त्यांनी पराभव करत विजयाची हॅट्रीक केली आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसने सत्ता स्थापन करावी अशीच भावना पंढरपूर भागातील  राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमधून व्यक्त केली जात आहे. असे झाले तर आमदार भालकेंचा मंत्रीमंडळातील समावेश नक्की मानला जात आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
मंगळवेढ्यात अनोळखी इसमाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने खळबळ

मंगळवेढ्यात अनोळखी इसमाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने खळबळ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शासकीय कार्यालयाप्रमाणे ‘या’ विभागाला पाच दिवसांचा आठवडा करण्यासाठी राज्य सरकारची हालचाली सुरू

कामाची बातमी! देवस्थान इनाम जमिनींबाबत महत्वाची अपडेट; राज्य सरकार घेणार ‘हा’ मोठा निर्णय

April 23, 2026
भजन आणि कीर्तनाच्या गजरात खुपसंगी येथे आज कै.सीताराम सलगर व कै.भामाबाई सलगर यांचा १५ वा पुण्यस्मरण सोहळा संपन्न होणार

भजन आणि कीर्तनाच्या गजरात खुपसंगी येथे आज कै.सीताराम सलगर व कै.भामाबाई सलगर यांचा १५ वा पुण्यस्मरण सोहळा संपन्न होणार

April 23, 2026
शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा; पोलीस संरक्षणासह ‘ही’ फी बंद करणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

हेलपाटे वाचणार! जमिन NA करण्यासाठी आता सोपी, जलद ऑनलाइन प्रणाली सुरु; बीपीएमएस प्रणालीचे महसुलीमंत्री बावनकुळेंच्या हस्ते लोकार्पण

April 22, 2026
महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

उन्हाळ्यात पावसाळा! नागरिकांसाठी सूचना जारी; ‘हे’ जिल्हे आज ‘यलो अलर्ट’वर; ‘या’ दिवसापर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता

April 22, 2026
Gas booking Number : आता गॅस बुकिंगसाठी संपूर्ण देशात एकच नंबर; जूना नंबर करा डिलिट

नागरिकांनो! गॅस सिलिंडरसाठी आता नवा नियम, हा नंबर नसेल तर सिलिंडर मिळणारच नाही; वाचा काय गरजेचं?

April 22, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

भावा-भावातील वाद विकोपाला! मंगळवेढ्यात शेतीच्या वादातून तुफान हाणामारी; संतापलेल्या भावाचा थेट डोक्यात प्रहार

April 22, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा