mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

चेक न वठल्याप्रकरणी आरोपीस एक महिना तुरुंगवास व 18 लाख रुपये नुकसान भरपाईची शिक्षा

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
चेक न वठल्याप्रकरणी आरोपीस एक महिना तुरुंगवास व 18 लाख रुपये नुकसान भरपाईची शिक्षा

मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-



उसने घेतलेले पैशापोटी दिलेला चेक न वठल्याप्रकरणी व्दारकेश उर्फ दादा दिनकर सुर्यवंशी याला मंगळवेढयाचे प्रथमवर्ग न्यायाधीश जी.एम.चरणकर यांनी एक महिना तुरुंगवास,18 लाख रुपये नुकसान भरपाई व ही नुकसान भरपाई दोन महिन्याच्या आत न दिल्यास सात दिवसाची साधी कैद अशी शिक्षा ठोठावली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,व्दारकेश उर्फ दादा दिनकर सुर्यवंशी(रा.भुई-माने गल्ली,मंगळवेढा)हा जमीन खरेदी विक्रीचा एजंट म्हणून काम करतो. त्याला जमिन व्यवसायासाठी पैशाची गरज असल्याने खूप वर्षापासून मैत्रीचे असलेल्या संबंधातून फिर्यादी दिगंबर दगडू भगरे यांचेकडे 16 लाख रुपये देण्याची मागणी केली असता फिर्यादीने त्याला 16 लाख रुपये दिले.तेव्हा आरोपीने फिर्यादीला शंभर रुपयांच्या स्टँपवरती 16 लाख रुपये रकमेची उसनवार पावती नोटरी करून दिली.ही उसनवार रक्कम दोन महिने ठरलेली मुदत संपून गेली तरीही त्याने परत केली नाही. त्यावेळेस फिर्यादीने त्याच्याकडे पैशाची मागणी केली असता त्याने रतनचंद शहा सहकारी बँक,मंगळवेढा शाखा पंढरपूरचा चेक स्वतः सही करून फिर्यादीच्या नावे दिला व चेक वठण्याची हमीही दिली. 

त्यावेळेस फिर्यादीने सदरचा चेक मंगळवेढा येथील लोकमंगल बँकेत भरला असता खातेवर रक्कम अपुरी असल्याचा शेरा मारून परत आला.त्यावेळेस फिर्यादीने त्याला वकिलामार्फत नोटीस दिली व मुदतीत निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट अ‍ॅक्ट कलम 138 प्रमाणे मंगळवेढा येथील न्यायालयात फौजदारी केस केली. 

यात फिर्यादीने दोन साक्षीदार स्वतः व भाऊ यांना तपासले. त्यात फिर्यादीकडे त्याची वडिलार्जीत जमिन विकल्याने 19 लाख रुपये आले होते. त्यातीलच 16 लाख रुपये आरोपीला दिल्याचे शाबीत केले. यात आरोपीने बचावात उसनवार पावती नोटरी अ‍ॅड.व्ही.आर.करंदीकर यांना तपासले असता त्यांच्या साक्षीवरूनही आरोपीने 16 लाख रुपये घेतल्याचे शाबीत झाले. 

यात फिर्यादीच्या वतीने केलेल्या युक्तीवादात,चेक, अनादर पत्र,नोटीस,उसनवार पावती या गोष्टी फिर्यादी पक्षाने शाबीत केल्याचे तसेच आरोपीने खातेवर रक्कम शिल्लक नसतानाही 16 लाख रुपयांचा खोटा चेक देवून कलम 138 प्रमाणे गुन्हा केला असून त्याला जास्तीत जास्त शिक्षा करावी असा युक्तीवाद करण्यात आला. 

तर आरोपीच्या वतीने सदरची रक्कम न घेतल्याचा युक्तीवाद करण्यात आला. दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकून न्यायालयाने फिर्यादीचा युक्तीवाद ग्राहय मानून आरोपी व्दारकेश सुर्यवंशी याला एक महिने तुरुंगवास,18 लाख रुपये नुकसान भरपाई व ही नुकसान भरपाई  न दिल्यास सात दिवसाची साधी कैद अशी शिक्षा ठोठावली.

यात फिर्यादीच्यावतीने  अ‍ॅड.सुजय तुकाराम लवटे(मंगळवेढा),तर आरोपीच्यावतीने अॅड.राजेश चौगुले,पंढरपूर व अ‍ॅड.आय.एम कडगे यांनी काम पाहिले.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
मंगळवेढ्यात एकाचा डेंग्यू आजाराने उपचारादरम्यान मृत्यू

मंगळवेढ्यात एकाचा डेंग्यू आजाराने उपचारादरम्यान मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भजन आणि कीर्तनाच्या गजरात खुपसंगी येथे आज कै.सीताराम सलगर व कै.भामाबाई सलगर यांचा १५ वा पुण्यस्मरण सोहळा संपन्न होणार

भजन आणि कीर्तनाच्या गजरात खुपसंगी येथे आज कै.सीताराम सलगर व कै.भामाबाई सलगर यांचा १५ वा पुण्यस्मरण सोहळा संपन्न होणार

April 23, 2026
शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा; पोलीस संरक्षणासह ‘ही’ फी बंद करणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

हेलपाटे वाचणार! जमिन NA करण्यासाठी आता सोपी, जलद ऑनलाइन प्रणाली सुरु; बीपीएमएस प्रणालीचे महसुलीमंत्री बावनकुळेंच्या हस्ते लोकार्पण

April 22, 2026
महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

उन्हाळ्यात पावसाळा! नागरिकांसाठी सूचना जारी; ‘हे’ जिल्हे आज ‘यलो अलर्ट’वर; ‘या’ दिवसापर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता

April 22, 2026
Gas booking Number : आता गॅस बुकिंगसाठी संपूर्ण देशात एकच नंबर; जूना नंबर करा डिलिट

नागरिकांनो! गॅस सिलिंडरसाठी आता नवा नियम, हा नंबर नसेल तर सिलिंडर मिळणारच नाही; वाचा काय गरजेचं?

April 22, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

भावा-भावातील वाद विकोपाला! मंगळवेढ्यात शेतीच्या वादातून तुफान हाणामारी; संतापलेल्या भावाचा थेट डोक्यात प्रहार

April 22, 2026
धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

द्राक्ष बागायतदारांनो सावधान! तोतया पोलीस फिरतायत तुमच्या मागावर; मंगळवेढ्यात तोतया पोलिसांचा सुळसुळाट; तपासणीच्या बहाण्याने चालकाच्या डोळ्यादेखत रक्कम लंपास

April 22, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा