
मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
दारूच्या नशेत मोबाईलवर बोलत असतांना आईसमोर तरूणाने विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली. विहीर पाण्याने तुडूंब भरली असल्याने आणि रात्र झाल्याले बचाव कार्य राबवता आले नाही. अखेर आज सकाळी मृतदेह बाहेर काढण्यात आला. याप्रकरणी नशिराबाद पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सुरेश नथ्थू पाटील यांचे कळगाव रस्त्यावरील जळगाव खुर्द शेतशिवारात मध्यप्रदेशातील पावरा कुटूंबीयांसाठी राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. साधारण पंधरा वर्षापासून सालदार याच खोल्यांमध्ये वास्तव्यास राहत आहे. जितेन सुकराम ठाकुर (वय-25) रा. चिरीया, मध्यप्रदेश हा त्याची विधवा आई भुरीबाई, व तीन भावांसह वास्तव्यास आहे.
आईच्या डोळ्या देखत..
रविवार हा पगाराचा दिवस असल्याने सालदारांना आठवड्याची मजुरी शेत मालका कडून वाटप झाली होती. काम संपल्याने शेतातील खोल्यांच्या बाहेर इतर सालदार महिलांमध्ये भुरीबाई बसलेली होती. संध्याकाळी 5:30 वाजेच्या सुमारास जितेन ठाकूर समोरून मोबाईल बोलतच येत होता. त्याने दारु प्यायल्याने तसा तो, फोनवरच कुणाशी तरी वाद घालत होता. बोलता बोलता त्याने विहीरी जवळ येवून चक्क उडी घेतल्याने आई भुरीबाई किंचाळून उठली..इतर मजुरांनी मदतीला विहरीच्या दिशेने धाव घेतली. डोळ्यादेखत मुलाने आत्महत्त्या केल्याने भुरीबाई कालपासून अश्रूढाळत बसली आहे.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज












