मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
भाजपमध्ये प्रवेश केलेल्या माढयाचे माजी आमदार धनाजी साठे व त्यांचे पुत्र दादासाहेब साठे यांनी गुरूवारी काँग्रेस भवनात माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
राज्यात भाजप – सेना युतीचे सरकार असताना माजी आमदार धनाजी साठे यांनी काँग्रेसला रामराम करून भाजपमध्ये प्रवेश केला होता.
यावेळी माजी आमदार सिध्दाराम म्हेत्रे, आ़ रामहरी रूपनवर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील, गटनेते चेतन नरोटे, बाळासाहेब शेळके, शिवलिंग सुकळे, गौरव खरात आदी उपस्थित होते. धनाजी साठे हे माजी मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांचे कट्टर समर्थक मानले जातात.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज