मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
आमच्या मालकीच्या जमिनीवरून राष्ट्रीय महामार्गाचे काम करायचे नाही, अन्यथा मी तुम्हाला खल्लास करून टाकीन असा दम भरत जी आर इन्फ्रा प्रोजेक्ट्स लिमिटेडचे वरिष्ठ व्यवस्थापक प्रदीपकुमार सिंग व त्यांच्या साथीदार अधिकारी कर्मचाऱ्यांना दगडफेक करून मारहाण केल्याची घटना वाटंबरे (ता.सांगोला) येथे घडली आहे.
सांगोला तालुक्यातून रत्नागिरी-नागपूर या राष्ट्रीय महामार्गाचे काम गेल्या वर्षभरापासून सुरू आहे. प्रदीपकुमार सिंग, रामपाल पात्रा, प्रिन्स श्रीवास्तव या अधिकाऱ्यांसह कर्मचारी वाटंबरे हद्दीतील बाहुबली ज्ञानू गवळी यांच्या मालकीच्या जमीन गट नंबर १५५ मधून रस्त्याच्या कॉक्रिटीकरणचे काम करीत होते.
यावेळी बाहुबली ज्ञानू गवळी त्याचा जावई पिंटू यादव आणि यादव यांची बहीण यांनी शिवीगाळ करून तिथून निघून जावा नाही तर तुम्हाला सर्वांना खल्लास करून टाकीन, अशी धमकी दिली. सर्वांना तिघे मिळून दगड मारू लागले. घाबरलेले सर्व अधिकारी कर्मचारी घाबरून पळून गेले. बाहुबली गवळी पिंटू यादव व त्याची बहीण अशा तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज