मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
तांबेवाडी आश्रमशाळा तांडा- भातंबरे (ता. बार्शी) येथे गावठी मद्य काढण्यावरून संजय देविदास चव्हाण (वय 35, रा. तांबेवाडी) याचा खून झाला.
याप्रकरणी मृत तरुणाच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सहा जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. त्यातील दोन संशयित आरोपींना वैराग पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
जाहिरातीसाठी संपर्क:7588214814
तांबेवाडी (ता. बार्शी) येथील संजय चव्हाण हा मोलमजुरीचे काम करत होता. संजय चव्हाण हा पोपट सोबा राठोड, ज्ञानू लालू राठोड, आकाश ज्ञानू राठोड, पपेश गणपत चव्हाण, रवी नामदेव राठोड (सर्व रा. यमाईतांडा भातंबरे, ता. बार्शी), शिवाजी गोपीनाथ चव्हाण (रा. गोरमाळ तांडा, ता.जि. उस्मानाबाद) यांच्याबरोबर फकिरा वसंत जाधव यांच्या शेतातील हातभट्टीचे काम करत होते. सर्वजण पुन्हा रात्रभर हातभट्टी दारू काढण्यास थांबले होते. यावेळी देविदास चव्हाण मुलगा संजयला शोधण्यास तेथे आले.
तेव्हा त्या सर्वांनी आम्ही रात्रभर हातभट्टी करणार असून त्याचा संजला पगार देणार असून तुम्ही परत जा असे त्यांना सांगितले. रात्रभर दारू पाडून झालेल्या भांडणात सहा जणांनी काठ्यांनी केलेल्या मारहाणीत संजयच्या सर्वांगावर गंभीर जखमा झाल्या. त्या मारहाणीत संजयचा मृत्यू झाला. त्याचे शव आमच्या शेतात टाकून निघून गेल्याची फिर्याद मृताच्या वडिलांनी वैराग पोलिसांत दिली.
याप्रकरणी सहा जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल झाला असून आकाश राठोड व पपेश चव्हाण या दोन आरोपींना रात्री उशिरा ताब्यात घेतल्याचे तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र राठोड यांनी सांगितले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज