मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
पोलिस खात्यात उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्यांना देण्यात येणारे राष्ट्रपती पोलिस पदकांची घोषणा शनिवारी करण्यात आली. केंद्रीय गृहमंत्रालयाने जाहीर केलेल्या यादीत देशभरातील १ हजार ४० पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील ५४ पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांना या पदकाने गौरवण्यात येईल.
उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांना प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलिस पदक, जीवन रक्षा पदक, अग्निशमन सेवा पदक, नागरी सेवा दल पदक बहाल करण्यात येतात. राष्ट्रपती पोलिस पदकांमध्ये उल्लेखनिय कामगिरीसाठी पोलिसांना दिले जाणारे शौर्य पदक, विशिष्ठ सेवा पदक व गुणवत्ता सेवा पदकांचा समावेश आहे.
देशातील ४ पोलिस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पोलिस र्शोर्य पदक, २८६ पोलिस शौर्य पदक, ९३ विशिष्ठ सेवा पदक आणि ६५७ पोलिस कर्मचारी, अधिकाऱ्यांना ‘गुणवत्ता सेवा पदक’ जाहीर करण्यात आले.
महाराष्ट्रातील १० पोलिस अधिकाऱ्यांना पोलिस शौर्य पदक, ४ पोलिस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती विशिष्ठ सेवा पदक, तर ४० पोलिसांना गुणवत्ता सेवा पदक जाहीर झाले आहे.
शौर्य पदक प्राप्त अधिकाऱ्यांची नावे
१. मिठू नामदेव जगदाळे
२. सुरपत बावाजी वड्डे
३. आशिष मारूती हलामी
४. विनोद राऊत
५ नंदकुमार अग्रे
६.डॉ.एमसीव्ही महेश्वर रेड्डी
७.समीरसिंह साळवे
८.अविनाश कांबळे
९. वसंत आत्राम
१०.हमीत डोंगरे
विशिष्ठ सेवा पदक प्राप्त अधिकारी
१. अर्चना त्यागी (आयपीएस)
२. संजय सक्सेना (आयपीएस)
३. शशांक सांडभोर (सहा.पोलिस आयुक्त)
४ . वसंत साबळे (सहा.पोलिस निरिक्षक)
महेश साबळे यांना सर्वोत्तम रक्षा पदक
संकटात सापडलेल्यांना वाचवून मानवतेचा आदर्श निर्माण करणाऱ्या व्यक्तींना जीवन रक्षा पदक दिले जाते. महाराष्ट्रातील ५ जणांना जीवन रक्षा पदक जाहीर झाले आहे. महेश पांडुरंग साबळे यांना सर्वोत्तम रक्षा पदक जाहीर झाले आहे. मुंबईतील कमला मिल आग दुर्घटनेत साबळे यांनी स्वत:चा जीव धोक्यात घालून अनेकांचे प्राण वाचविले होते. जीवन रक्षा पदक जाहीर झालेल्यामध्ये एन. कार्तिकेयन, प्रमोद बाळासाहेब देवडे, मास्टर शिवराज रामचंद्र भांडारवड, तसेच दत्तात्रय सुरेश टेंगळे यांचा समावेश आहे.
अग्निशमन सेवा पदक
अग्निशमन सेवेमध्ये उल्लेखनिय कामगिरीसाठी महाराष्ट्रातील ७ अग्निशमन अधिकारी व कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती शौर्य पदक जाहीर झाले आहे. प्रभात सुरजलाल रहांगदळे (मुख्य अग्निशमन अधिकारी), राजेंद्र चौधरी (उपमुख्य अधिकारी), रविंद्र अंबुलगेकर (विभागीय अग्निशमन अधिकारी), मिलिंद दोंडे (सहाय्यक अग्निशमन अधिकारी),अभिजीत सावंत (स्टेशन अधिकारी),सुधीर वर्तक (वाहनचालक),दिलीप पालव (उपमुख्य अग्निशमन अधिकारी) यांचा त्यात समावेश आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज