मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
मागील तीन ते चार दिवसात आंतरराष्ट्रीय कमोडिटी बाजारात खनिज तेलाच्या किमतीतील घसरण कायम आहे. त्यामुळे पेट्रोलियम कंपन्यांनी शनिवारी इंधन दरात कपात केली आहे. देशभरात आज पेट्रोल सरासरी 17 पैसे आणि डिझेल 19 पैशांनी स्वस्त झाले. कमोडिटी बाजारात खनिज तेलाचा भाव (यूएस क्रूड) 63 डॉलर प्रति बॅरलपर्यंत खाली आहे. या कपातीनंतर पेट्रोल-डिझेल दराचा चालू महिन्यातील नीचांकी स्तर आहे.
मागील काही दिवसांपासून इंधन दरात घसरण झाली आहे. शनिवारी मुंबईत पेट्रोल प्रति लीटर 80.25 रुपये आहे तर डिझेलचा दर 71.15 रुपये आहे. राजधानी दिल्लीत पेट्रोलसाठी ग्राहकांना 74.65 रुपये मोजावे लागत असून डिझेलचा दर 67.86 रुपये आहे.
बंगळूरमध्ये आजचा पेट्रोलचा दर 77.15 रुपये आहे. डिझेल 70.12 रुपये आहे. चेन्नईत पेट्रोल 77.54 रुपये आणि डिझेल 70.12 रुपये आहे. हैदराबादमध्ये पेट्रोल 79.38 रुपये असून डिझेल 73.99 रुपये आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज