मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
हजारो सुरक्षा कर्मचारी, चेहरेपट्टी ओळखण्याची यंत्रणा, ड्रोन आणि सीसीटीव्हीद्वारे दिल्लीतील प्रजासत्ताक दिनाच्या सोहोळ्यावर लक्ष्य ठेवण्यात येत आहे. ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जैर बोल्सोनारो हे कार्यक्रमाचे प्रमुख पाहूणे आहेत.
राजपथावरून लालकिल्ल्याच्या दिशेने होणाऱ्या आठ किमी संचलनावर लक्ष ठेवण्यासाठी या भागातील उंच इमारतींवर नेमबाज आणि स्नायपर्स तैनात करण्यात आले आहेत. संशयितांची ओळख पटवण्यासाठी चेहरेपट्टी ओळखणारी यंत्रणा प्रवेशद्वारावर बसवण्यात येणार आहे. शेकडो सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत. यापुर्वीही त्या भागात 150 सीसीटिव्ही होते.
आम्ही चार स्तरीय सुरक्षा यंत्रणा राबवली आहे.आतमध्ये, मध्यभागी, तसेच बाहेर आणि राजधानीच्या सीमेवर ही यंत्रणा कार्यरत असेल. सुमारे पाच ते सहा हजार पोलिस कर्मचारी आणि निमलषकरी दलाच्या 50 कंपनी तैनात करण्यात आल्याचे पोलिस उपायुक्त इश सिंघल यांनी सांगितले.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज