मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
आर्थिक अडचणीतून मार्गक्रमण करीत असलेल्या महापालिकेच्या १४ व्या वित्त आयोगाच्या निधीला शासनानेच कात्री लावली आहे सोलापूर साठी आलेले ३१ कोटी रुपये अमृत योजनेच्या मलनिस्सारण प्रकल्पासाठी वर्ग करून महापालिकेचा पैसा परस्पर ठेकेदारांच्या घशात शालण्याचा काम शासनाने केल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे गटनेते आनंद चंदनशिवे यांनी केला आहे .
शासनाच्यावतीने नागरिक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पायाभूत प्रकल्पासाठी शासनाकडून कोट्यवधी रुपयांचा निधी चौदाव्या वित्त यातून देण्यात आला होता . मात्र हा निधी वर्ग करण्याचा धक्कादायक प्रकार वंचित आघाडीचे नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी उजेडात आणला आहे .
याबाबत राज्यातील सर्व महापालिकांना तब्बल ३१४ कोटी रुपयाचा निधी वर्ग केला जाणार आहे . यामध्ये सोलापूर महानगरपालिकेत मिळालेल्या निधीपैकी ३१ कोटी ५८ लाख रुपयांचा निधी वर्ग केला जात असल्याची आनंद चंदनशिवे यांची तक्रार असून यासंदर्भात राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे आपण तक्रार केली असून लवकरच त्यांची भेट घेऊन वंचित आघाडीचे संस्थापक अध्यक्ष डॉ . प्रकाश आंबेडकर यांच्या माध्यमातून हा निधी महापालिकेस पायाभूत सुविधांसाठी मिळण्यासाठी पुन्हा मिव्यवा साकडे धालणार घालणार आहोत . हा निधी पुन्हा वर्ग नाही केलास तर यासंदर्भात तीय आंदोलन करण्याचा इशाराही आनंद चंदनशिवे यांनी दिला आहे .
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज