मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
बासलेगाव (ता.अक्कलकोट) येथील गाव कामगार पोलिस पाटीलसह अन्य एकावर मुलींना छेडछाड केल्याप्रकरणी त्यांच्यावर अक्कलकोट दक्षिण पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्याने तालुक्यातील पोलिस पाटलांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
या घटनेबाबत पोलिस सूत्राकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, फिर्यादीची मुलगी व तिची मैत्रिण दि.2 फेब्रुवारी 2019 रोजी उडगी (ता.अक्कलकोट) येथील मैत्रिणीच्या नातेवाईकाकडे गेली होती. तेथील कार्यक्रम संपवून बासलेगाव अलीकडे असलेल्या देवीच्या मंदिरासमोर सायं.5.30 वाजणेच्या दरम्यान आरोपी गावकामगार पोलिस पाटील कुंभार व प्रशांत कवडे (दोघे रा. बासलेगाव, ता.अक्कलकोट) या दोघांनी आपल्या मोबाईलवर माझ्या मुलीला झोंबाझोंबी करीत शुटींग केले. अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करीत, माझ्या मुलीकडील मोटारसायकलचे चावी घेवून हवा सोडली. सदरील प्रकार मिटविण्यासाठी पैशाची मागणी केली. पैसे देण्यासाठी वारंवार माझ्या मुलीस व तिच्या मैत्रीणीस फोन करुन पैशाची मागणी करीत त्रास देत होता. मुलीच्या लग्नाचे वय असल्यामुळे त्यांचे विरुध्द तक्रार न देता मोबाईल बंद ठेवले होते. परंतु या सदरील दोघा आरोपींनी दि.2 फेब्रुवारी 2019 रोजी फेक अकाऊंट टेक्नीकल गुरुजी 5151, टेक्नीकल गुरुजी 0123, एफ.आर.आय. 307, फ्रेंडन्स क्लब आदी ग्रुपवर पोलिस पाटील कुंभार व प्रशांत कवडे यांनी शुटींग केलेले सर्व व्हिडिओ व्हायरल करुन त्याच्या खाली अश्लिल कमेंटस् टाईप करुन मनाला लज्जा वाटेल असे माहिती प्रसारित करुन बदनामी केल्या प्रकरणी दोघांवर अक्कलकोट दक्षिण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेतील मुख्य आरोपी गाव कामगार पोलिस पाटील कुंभार यास पोलिसांनी अटक करुन ताब्यात घेतले आहे. त्यास मंगळवार, 28 जानेवारी 2020 रोजी अक्कलकोट मे.न्यायालयासमोर उभे करणार असल्याची माहिती दिली आहे. या घटनेतील अधिक तपास पो.नि. विजय जाधव हे करीत आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज