मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
मंगळवेढा येथील श्री संत दामाजी कारखाना व विधी सेवा समिती मंगळवेढा बार असोसिएशन आणि मंगळवेढा तालुका पोलिस स्टेशन यांच्या वतीने रस्ता सुरक्षा अभियाना निमित्त मंगळवेढयाचे दिवाणी व फौजदारी न्यायाधिश जी.एम.चरणकर यांनी कार्यस्थळावर येऊन वाहतुकीच्या नियमांविषयी माहिती दिली.
यामध्ये ऊस वाहतुक करणा-या ट्रॅक्टर चालक व मालक यांना रस्ता सुरक्षिततेविषयी मार्गदर्शन करण्यांत आले. सध्या अपघाताचे प्रमाण वाढत असुन त्यामध्ये होणारी जीवितहानी ही चिंताग्रस्त करणारी आहे 2017 ते 2019 या काळामध्ये संपूर्ण भारतात दरवर्षी पाच लाख अपघात होवून त्यामध्ये जवळपास दीड लाख नागरिक मयत होतात यावरुन अपघाताची तिव्रता मोठया प्रमाणात दिसत आहे.सध्या जास्तीत जास्त प्रमाणात जनजागृती होणे गरजेचे आहे. आपण वाहतुकीचे नियमांचे दैनंदिन आचारणात आणणे गरजेचेआहे.आपण गाडी चालविताना आपली व पाठीमागून येणा-याचे घरी कोणीतरी वाट पाहत आहे याची जाणीव असावी. नागरिकांनी व विशेषत: वाहन चालकांनी याबाबत दक्ष राहून स्वत:बरोबरच इतरांच्या सुरक्षेची काळजी घेणे आवश्यक असल्याचे मत चरणकर यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंगळवेढा बार असोसिएशनचे उपाध्यक्ष अॅड.सुजय लवटेे यांनी केले. त्यांनी सांगितले की कायदेविषयक जुजबी शिबीर कारखान्यावर घेण्याचा उद्देश म्हणजे प्रत्येकास कायदयाचे ज्ञान असले पाहिजे. सरकारी वकील बनसोडे बोलतांना म्हणाले की, ऊस वाहतुक करणा-या ट्रॅक्टर ट्रॉलीला रिफलेक्टर व बॅनर लावण्यात यावेत. तसेच क्षमतेपेक्षा जास्त वाहतुक करण्यात येऊ नये, साऊंडचा आवाज मर्यादेपेक्षा जास्त ठेवू नये.नादुरुस्त वाहनांच्या दुरुस्तीकरिता वाहन रस्त्यावर उभे करण्यात येऊ नये.
रात्रीच्या वेळी लाईटचा पुरेपुर वापर करणेत यावा अशा अनेक प्रकारच्या बाबींचे मार्गदर्शन करण्यांत आले. बिगर इन्शुरन्सचे वाहन चालवू नये असे आवाहन बनसोडे यांनी केले.
यावेळी मंगळवेढा बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड.बी.एन.पटवर्धन व मंगळवेढा पोलिस निरिक्षक जोतीराम गुंजवटे यांनी रस्ता सुरक्षतेबाबतचे नियम सांगितले व अपघाताचे प्रमाण कमी होणेसाठी जनजागृती होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले.
कारखान्याचे चेअरमन समाधान आवताडे यांनी कारखान्यांकडे ऊसतोड वाहतुकीचे काम करणा-या वाहन चालक यांना सुरक्षिततेचे पालन करणेचे आवाहन करुन कारखान्यामार्फत आवश्यक ती मदत करणेचे अभिवचन दिले.
याप्रसंगी मंगळवेढा बार असोसिएशनचे सचिव अॅड.राजु बामणे, माजी अध्यक्ष अॅड. डी.सी.जाधव, वाहतुक शाखेचे हवालदार बंडु कंुभार, कारखान्याचे संचालक सुरेश भाकरे, बाळासाहेब शिंदे, परचेस ऑफिसर भारत निकम, वक्र्स मॅनेंजर सुहास शिनगारे, प्र.चिफ केमिस्ट प्रशांत माळवदे, प्र.शेती अधिकारी रमेश पवार, प्र.चिफ अकौंटंट रमेश गणेशकर, प्र.लेबर ऑफिसर आप्पासोा शिनगारे यांच्यासह सर्व खातेप्रमुख, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्र.कार्यालय अधिक्षक दगडू फटे यांनी केले तर आभार संचालक सुरेश भाकरे यांनी मानले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज