मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
इयत्ता ९ वीच्या वर्गात शिकणाऱ्या १५ वर्षीय शाळकरी मुलीवर जबरदस्तीने अत्याचार करण्यात आल्याची घटना सांगोला तालुक्यात घडली आहे . याप्रकरणी अक्षय ऊर्फ मुन्ना संजय खंडागळे ( रा . मेथवडे ) व शिवाजी विठ्ठल मोळक ( रा . धायटी ) या दोघाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे .
पिडीत मुलीचे आई – वडील बाहेरगावी गेले होते . ही संधी साधत पीडित मुलीशी शिवाजी मोळक याने फोनवरून जवळीक साधली . तसेच त्याने अक्षय ऊर्फ मुन्ना खंडागळे याची पीडित मुलीशी ओळख करून दिली . सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर २०१९ दरम्यान पिडीत मुलगी मंदिरातील आरती संपवून आजीच्या घरी झोपायला जात होती . त्यावेळी अक्षय खंडागळे व शिवाजी मोळक त्याठिकाणी आले .
अक्षय याने तिचे तोंड दाबून डाळिंबाच्या बागेत नेले . ‘ मी तुझ्यावर प्रेम करतो , मी तुझ्याशी लग्न करणार आहे ‘ , असे म्हणून जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले . यावेळी शिवाजी मोळक हा बाजूला थांबला होता . त्यानंतर ही घटना कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी सदर दोघांनी पिडीतेला दिली असल्याचे फिर्यादीत नमुद करण्यात आले आहे .
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज