मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
गेल्या पाच दिवसापासून मंगळवेढा नगरपालिकेच्या आवारात नगराध्यक्षा अरुणा माळी यांचे मुख्याधिकारी यांच्या विरोधात आणि १२ नगरसेवकांचे नगराध्यक्षा माळी यांच्या विरोधात सुरू असलेले आंदोलन अखेर गुरूवारी जिल्हा प्रशासन अधिकारी पंकज जावळे यांनी चौकशी अधिकारी नियुक्त करून ३० दिवसात चौकशीसह उचित कार्यवाही करण्याचे लेखी पत्र दिल्यानंतर मागे घेण्यात आले
जाहिरातीसाठी संपर्क:7588214814
मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांच्या कारभाराची चौकशी करून कारवाई करावी , या मागणीसाठी दि. २६ जानेवारीपासून नगराध्यक्षा अरुणा माळी यांनी धरणे आंदोलन सुरू केले होते.
त्याचदिवशी उपनगराध्यक्ष चंद्रकांत घुले, अजित जगताप, प्रवीण खवतोडे यांच्यासह १२ नगरसेवकांनी नगराध्यक्षा अरुणा माळी या मनमानी कारभार करतात. त्यांचे पती शासकीय कामात हस्तक्षेप करतात. त्यामुळे त्यांच्यावर करवाई करण्यासाठी धरणे आंदोलन सुरू केले होते.
गेली पाच दिवस हे आंदोलन सुरू होते . गुरूवार जिल्हा प्रशासन अधिकारी जावळे यांनी नगराध्यक्षा माळी व १२ नगरसेवक यांना स्वतंत्र लेखी पत्राद्वारे त्यांच्या तक्रारीची चौकशी करण्यासाठी स्वतंत्र अधिकारी नेमून ३० दिवसात उचित कार्यवाही केली जाईल , असे पत्र येथील महसूल विभागात पाठवून दिले . त्यानंतर नायब तहसीलदार मागाडे यांनी उपोषणस्थळी भेट देऊन आंदोलनकर्त्यांना पत्र दिले . त्यामुळे दोन्ही आंदोलने मागे घेण्यात आली .
यावेळी तक्रारीबाबत ३० दिवसांत कारवाई न झाल्यास नगराध्यक्षा माळी यांनी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर तर पक्षनेता अजित जगताप यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसणार असल्याचे सांगितले.
अतिक्रमणांविरोधात आंदोलन
मंगळवेढा नगरपालिके समोर राजे प्रतिष्ठानचे सुदर्शन ताडयांचे गेली तीन दिवसांपासून शहरातील अतिक्रमणे काढण्यात यावीत , यासाठी धरणे आंदोलन सुरू आहे . त्यांच्या मागणीकडे नगरपालिकेनेदुर्लक्ष केले आहे . आंदोलन मागे घ्यावे यासाठी दबाव येऊ लागला असल्याचे ताड यांनी सांगितले . तसेच सुदर्शन यास त्यांच्या वडिलांनी उपोषणस्थळी येऊन मारहाण करत उपोषणमागे घेण्याबाबत सांगितले . याबाबत सुदर्शन याने आपल्या वडिलाविरोधात मंगळवेढा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज