मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
मंगळवेढा तालुक्यातील तांडोर येथील भिमा नदीच्या पात्रातून बेकायदा वाळू चोरी करणाऱ्या वाहनांवर पोलिस अधिक्षक यांच्या विशेष पथकाने छापे टाकून वाहनासह जवळपास १८ लाखांचा मुद्देमाल जप्त करून १० लोकांविरूध्द वाळू चोरी व पर्यावरण संरक्षण अधिनियमानुसार गुन्हे दाखल केले आहेत.
दरम्यान या जंबो कारवाईमुळे वाळू चोरी करणाऱ्यामध्ये खळबळ माजली आहे.
पोलिस अधिक्षक कार्यालयाचे स्कॉड पथक मंगळवेढा तालुक्यात गस्त घालत असताना तांडोर येथे भिमा नदीच्या पात्रातून दि ३० रोजी रात्री २ . ४५ वा . अवैधरित्या वाळू उपसा जेसीबीच्या सहाय्याने करीत असल्याची गोपनीय माहिती प्राप्त होताच या पथकातील सहाय्यक पोलिस निरिक्षक भुजबळ , पोलिस शिपाई कल्याण भोईटे , रणजित मदने , लक्ष्मण हेमाडे , दत्तात्रय झिरपे , यांनी छापा टाकून ट्रॅक्टर , जे . सी . बी . व डंपर असा घेरावा घालून मुद्देमाल १८ लाखाचा मुद्देमाल जप्त केला .
यादरम्यान दत्तात्रय गायकवाड ( वय २२ , भाळवणी ) , दिपक आसबे ( वय २५ , मारापूर ) , अविष्कार शिंदे ( वय २२ , पंढरपूर ) , पांडुरंग गरंडे ( वय २४ , कचरेवाडी ) , पंकज घाडगे ( वय २६ पंढरपूर ) , प्रविण मळगे ( वय २३ , तांडोर ) , बाळकृष्ण गायकवाड , बंडू यादव , लक्ष्मण गायकवाड , राजाराम गवळी आदींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे . पोलिसांनी वाळू उपसा व वाहतूकीसाठी लागणारी वाहने जप्त केली आहेत . याची फिर्याद स्कॉड पथकातील शैलेश जाधव यांनी दिली आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज