मंगळवेढा : समाधान फुगारे
मंगळवेढा तालुका प्राथमिक संघाच्या वतीने दरवर्षी अखिल भारतीय शिक्षक संघाचे संस्थापक आचार्य दादासाहेब दोंदे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त दिले जाणारे जिल्हास्तरीय आचार्य दादासाहेब दोंदे आदर्श शिक्षक,आदर्श शाळा,आदर्श पत्रकारिता,आदर्श गटशिक्षणाधिकारी),आदर्श विस्ताराधिकारी,आदर्श केंद्रप्रमुख,आचार्य दोंदे जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाले
असून पुरस्कार वितरण सोहळा पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघाचे विद्यमान आमदार भारत भालके यांचे शुभहस्ते व महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे नेते संभाजीराव थोरात यांच्या अध्यक्षतेखाली रविवार दि.२ फेब्रुवारी २०२० रोजी दुपारी १२ वा.श्रीराम मंगल कार्यालय येथे आयोजित केला असल्याची माहिती शिक्षक संघाचे राज्य उपाध्यक्ष संजय चेळेकर यांनी दिली.
जाहिरातीसाठी संपर्क:7588214814
याप्रसंगी राष्ट्राच्या जडणघडणीत शिक्षकांचे योगदान या विषयावर महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्याख्याते प्रा.राजकुमार कदम (विद्या प्रतिष्ठान,बारामती)यांचे व्याख्यानही आयोजित केले आहे.
या कार्यक्रमासाठी सोलापूर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा शिक्षण व आरोग्य सभापती दिलीप चव्हाण, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष बाळकृष्ण तांबारे,पंचायत समितीच्या सभापती प्रेरणाताई मासाळ, उपसभापती सुर्यकांत ढोणे,नगराध्यक्षा अरुणाताई माळी,जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अजित जगताप, गटविकास अधिकारी सुप्रिया चव्हाण,मुख्याधिकारी पल्लवी पाटील, गटशिक्षणाधिकारी पोपट लवटे,प्रशासनाधिकारी शाहू सतपाल,शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष मच्छिंद्रनाथ मोरे,सोलापूर जिल्हा शिक्षक सोसायटीचे चेअरमन बब्रुवाहन काशिद,महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा चंदाराणी आतकर,ज्येष्ठ सल्लागार अरूण डोरले आदि मान्यवरांची उपस्थिती असणार आहे.
पुरस्कार प्राप्त शिक्षक,शाळा, पत्रकार पुढीललप्रमाणे: आदर्श शिक्षक:भुजंगराव खटकाळे(धर्मगांव), राजशेखर कोष्टी(बेदरेवस्ती),सायाप्पा कुंभार(मातुर्लिंगवस्ती),विद्या पाटील(मरवडे,मुले),चंद्रकांत डांगे (हुलजंती),शिवाजी भुसनर(बंडगरवस्ती),छाया कांबळे(मोरेवाडी),युवराज सावंत(घाडगेवाडी),सुर्यकांत पाटील(नंदेश्वर),अरुणा अंकोलीकर(खोलवाडी), प्रविण शिवशरण(बावची), पांडुरंग मासाळ(चौगुलेवस्ती),दिगंबर बनसोडे(लक्ष्मी दहिवडी),गोपाळ लेंडवे (पौट),भारती नागणे (न.पा. मंगळवेढा),कैलास हेगडे(इंग्लिश स्कूल,मंगळवेढा),आण्णा सुरवसे(मोहोळ),अनिता घुले(बार्शी),गजानन मिराशे (अक्कलकोट),नितीन पाटील(पंढरपूर),सोपान मोहिते(माढा),वैशाली शिवगुंडे(उ.सोलापूर),शितल शिंदे(माळशिरस),शोभा निकम(करमाळा),रतन कोळेकर(सांगोला),प्रमोद कस्तुरे(द.सोलापूर),आदर्श शाळा:शिरसी(मंगळवेढा),भालेवाडी(मंगळवेढा),घरनिकी(मंगळवेढा),शिवणगी(मंगळवेढा),खांडेकरवाडी(सांगोला),शिरापूर(मोहोळ),शेंद्री(बार्शी),तिल्हेहाळ(द.सोलापूर),चिक्केहळ्ळी(अक्कलकोट),खरसोळी(पंढरपूर),उजनी(माढा),सोरेगाव(उ.सोलापूर),पानीव(माळशिरस),अंजनडोह(करमाळा),जीवनगौरव:शिवाजी पाटील (ब्रम्हपुरी),
आदर्श पत्रकारिता:दत्तात्रय नवत्रे (दै.पुण्यनगरी),आदर्श गटशिक्षणाधिकारी:धनंजय देशमुख(माळशिरस),आदर्श विस्ताराधिकारी:विकास यादव (मोहोळ),आदर्श केंद्रप्रमुख:खातुनबी आतार(माढा)
तरी सदर कार्यक्रमास मंगळवेढा तालुक्यातील तमाम शिक्षक बंधू-भगिनींसह,पत्रकार बांधव आणि सोलापूर जिल्ह्यातील शिक्षक बंधू-भगिनी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन मंगळवेढा तालुका प्राथमिक शिक्षक संघ व महिला आघाडी तसेच नगरपालिका शिक्षक संघाच्या वतीने करण्यात आले आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज