मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
मी तुझ्या बायकोसोबत रजिस्टर लग्न केले असून तुझ्याकडे पाठविणार नाही , तुला काय करायचे ते कर असे म्हणून चौघांनी म्हाळाप्पा भोरकडे ( वय ४० ) यांना लोखंडी गजाने मारहाण करून तुला जीवंत सोडणार नाही अशी धमकी दिल्याप्रकरणी चौघांविरूध्द गुन्हा दाखल झाला असून ही घटना हलजंती येथे दि . २६ रोजी घडली आहे .
आरोपी मनगेनी जकवडर याने त्याच्या मोटर सायकलवर फिर्यादी म्हाळाप्पा भोरकडे यास घेवून सोड्डी फाटा येथे गेले .
यावेळी आरोपीने फिर्यादीस मी तुइया बायकोसोबत रजिस्टर लग्न केले आहे . तीला तुझ्याकडे पाठविणार नाही , तुला काय करायचे ते कर असे म्हणून निलाप्पा ढाणे , मनाप्पा ढाणे रा . सोड्डी व ताई म्हाळाप्पा भोरकडे , मनगेनी जकवडर आदीनी लोखंडी गजाने , दगडाने मारहाण करून तुला आता सोडणार नाही अशी धमकी दिल्याचे दिलेल्या फिर्यादीत असून अधिक तपास सहाय्यक फौजदार जमादार हे करीत आहेत .
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज