mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

दीड कोटी कुटुंबांना मिळणार जमिनीचे मालकी हक्क,ड्रोनद्वारे मोजणी सुरु

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
दीड कोटी कुटुंबांना मिळणार जमिनीचे मालकी हक्क,ड्रोनद्वारे मोजणी सुरु

मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-

राज्यातील 43721 गावांची ड्रोनद्वारे मोजणी केली जाणार आहे, अशी माहिती भूमी अभिलेख विभागाचे पुणे विभागीय उपसंचालक किशेार तवरेज यांनी येथे दिली. मोजणीचे काम पूर्ण झाल्यानंतर राज्यातील सुमारे दीड कोटी कुटुंबांना जमीनीच्या मालकी हक्काची कागदपत्रे उपलब्ध होणार असून यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळू शकते, असेही श्री. तवरेज यांनी सांगितले.

उपसंचालक किशेार तवरेज दोन दिवस सोलापूर दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी सोलापूर भूमी अभिलेख कार्यालयास भेट देऊन मालमत्ता पत्रिकांचे संगणकीकरण कागदपत्रांचे स्कॅनिग आणि कॉर्स स्टेशनच्या उभारणी बाबतच्या आढावा घेतला. यावेळी जिल्हाअधीक्षक हेमंत सानप सोबत होते.

श्री. तवरेज यांनी सांगितले की, 2011 च्या लोकसंख्या नोंदणीनुसार राज्यातील 43721 गावांची ड्रोणद्वारे मोजणी केली जात आहे. पुणे जिल्ह्यातील पूरंदर तालुक्यातील सोनारी गावात याबाबतचा प्रायोगिक प्रकल्प राबवण्यात आला. यासाठी भारतीय सर्व्हेक्षण संस्थेची तांत्रिक मदत मिळत असून यासाठीचा सर्व खर्च ग्रामविकास विभागामार्फत केला जात आहे.  पुण्यातील पुरंदर हवेली आणि दौंड या तीन तालुक्याचे ड्रोणद्वारे छायाचित्रण पूर्ण झाले आहे. राज्यातील सर्व गावांची पारंपारिक पध्दतीने मोजणी करण्यासाठी अनेक वर्ष लागली असती पण ड्रोणद्वारे येत्या काही कालावधीत मोजणी पूर्ण होऊ शकेल. ड्रोणद्वारे संकलित केलेल्या डाटाच्या आधारे गाव नकाशे तयार करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचे संगणकांची आवश्यकता आहे. हे संगणक खरेदी करण्याची प्रक्रिया सुरु आहे. पारंपारिक पध्दतीने मोजणीसाठी सुमारे दीड हजार कोटी रुपये लागले असते मात्र ड्रोनद्वारे मोजणीसाठी 373 कोटी रूपये खर्च अपेक्षित आहे.

मोजणीसाठी वापरण्यात येणारे ड्रोन जर्मन तंत्रज्ञानावर आधारित आहे. हे ड्रोन सलग पंचावन्न मिनिटे आकाशात उडू शकते. वीस चौरस किलोमिटरच्या परिसरातील छायाचित्रण करण्याची या ड्रोनची क्षमता आहे. जास्तीत जास्त पाचशे मीटर उंचीवरून छायाचित्रण करु शकते. मात्र अचूकतेसाठी एकशवीस मीटरवरुन छायाचित्रण केले जात असल्याने पाणी, उंच सखल भाग, झाडे यांचा अडथळा न येत नाही.  एका दिवसात 15 गावांचे छायाचित्रण करु शकते, असे श्री. तवरेज यांनी सांगितले.

ग्रामीण अर्थव्यवस्थेला

चालना मिळणार

ग्रामीण भागातील कुटुंबाना जमिनीच्या मालकीचे कागदपत्रे मिळाल्यामुळे त्यांना वित्तीय संस्थांकडुन कर्ज मिळू शकते. कर्ज मिळाल्यामुळे ग्रामीण भागात छोटे-मोठे उद्योग व्यवसाय सुरु होऊ शकतात.यामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळू शकते. त्याचबरोबर ग्रामीण भागातील शासकीय जमिनी, त्या जमिनीवर अतिक्रमण झाले असल्यास याबाबतही माहिती मिळू शकते. मालमत्ता निश्चित झाल्याने ग्रामपंचायतीच्या करमहसुलातही वाढ होणार असल्याचे श्री.तवरेज यांनी सांगितले.

सोलापुरात उभारणार

पाच कॉर्स स्टेशन

ड्रोणद्वारे मोजणीत अचूकता यांनी यासाठी राज्यात 77 ठिकाणी कॉर्स स्टेशन ( continuously operating reference station) उभारण्यात येणार आहेत. त्यापैकी पाच स्टेशन सोलापूरात उभारली जाणार आहेत. अक्कलकोट, अकलुज, करमाळा, मंगळवेढा आणि मोहोळ ही स्टेशन असतील.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: Latest NewsSolapur

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
पंचवीस हजाराची लाच स्वीकारताना वनरक्षकास अटक

पंचवीस हजाराची लाच स्वीकारताना वनरक्षकास अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राजमाता अर्बन बँक रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; दामाजी चौकात बँकेची 24 तास ATM सेवा सुरू

मंगळवेढ्यात ‘राजमाता बँकेचा’ उद्या वर्धापनदिन; गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर चहापानाचे आयोजन

March 18, 2026
मंगळवेढ्यातील दोन महिलांनी अनेकांना घातला लाखोंचा गंडा; मोठे रॅकेट उघडकीस येणार

​पोलिसांचा आशीर्वाद की यंत्रणेचा सुस्तपणा? गुन्हा दाखल असलेले ‘ते’ १० विद्यार्थी अजूनही मोकाटच; मनसेचा पोलीस महानिरीक्षकांना सवाल

March 18, 2026
सोलापुरात चोरट्यांची नवी शक्कल!  खिडकीतून बांबूच्या साह्याने केली चोरी

मंगळवेढा हादरलं! चाकूचा धाक दाखवून भरवस्तीत घरफोडी; सव्वा लाखांचा मुद्देमाल लंपास; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

March 18, 2026
दक्षिण भागात म्हैसाळचे पाणी “टेल टू हेड” मिळणेसाठी आ.आवताडे यांची विधानसभेत मागणी; देवेंद्र फडणवीस यांचे सकारात्मक उत्तर

नदी वाचवा, निधी द्या! भीमेच्या शुद्धीकरणासाठी १०० कोटी द्या; आमदार आवताडेंची सरकारकडे आग्रही मागणी; विधानसभेत घुमवला आवाज

March 17, 2026
बडा मासा! मंगळवेढा प्रांत कार्यालयातील तलाठी निघाला लाचखोर; लाचेची रक्कम घेऊन केला पोबारा; लाच कुणाच्या सांगण्यावरून?

मोठी बातमी! ​गरीबांच्या हक्काच्या पैशावर डल्ला; लाचखोर ग्रामपंचायत कर्मचारी अटकेत

March 17, 2026
कामाची बातमी! मंगळवेढ्यातील गजानन लोकसेवा हॉस्पिटलमध्ये महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया उपचार सुरू

मंगळवेढ्यातील गजानन लोकसेवा हॉस्पिटलच्या वर्धापन दिनानिमित्त भव्य आरोग्य शिबीर: मोफत तपासणी आणि उपचारांची सुवर्णसंधी

March 17, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा