mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

खासदार डॉ.जय सिद्धेश्वर महास्वामींचा फैसला आता 15 फेब्रुवारीला,पुरावा संशयास्पद

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
खासदार डॉ.जय सिद्धेश्वर महास्वामींचा फैसला आता 15 फेब्रुवारीला,पुरावा संशयास्पद



मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-



सोलापूरचे भाजप खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी ऊर्फ नुरंदस्वामी गुरुबसय्या हिरेमठ यांनी सोलापूरच्या जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे दिलेले पुरावे (तलमोड, ता. उमरगा, जि. उस्मानाबाद) येथील मोडी लिपीतील फसली उतारे संशयास्पद असल्याचा अहवाल दक्षता पथकाने दिला आहे. 


1344 व 1347 सालातील मोडी भाषेतील जमीन कसत असलेले व त्यावर जातीचा उल्लेख असलेले पुरावे संशयास्पद असून तलमोड गावातील बापू यमाजी पाटील यांच्या शेतातील जो पुरावा दिला आहे. तो व्यक्तीच त्या गावात नसल्याचेही निरीक्षण या अहवालात नोंदविण्यात आले आहे.


भाजपचे खासदार डॉ़ जयसिध्देश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी बेडा जंगम जातीच्या पडताळणीसाठी मागील तारखेस तडमोड (गुंजोटी ता़ उमरगा) येथील वडिलांच्या नावे असलेले पीक (फसल) उतारे संशयास्पद असल्याचा अहवाल दक्षता पडताळणी समितीने दिला आहे. यावर म्हणणे मांडण्यासाठी महास्वामी याचे वकील यांनी मुदत मागितल्यानंतर पुढील सुनावनी १५ फेब्रुवारी  २०२० रोजी ठेवण्यात आली आहे.


खासदार डॉ़ जयसिध्देश्वर शिवाचार्य महास्वामी यांचा बेडा जंगम जातीचा दाखला बोगस असल्याची तक्रार राजेंद्र मुळे, प्रमोद गायकवाड, विनायक कंदकुरे यांनी केली आहे़ यावर २७ डिसेंबर रोजी झालेल्या सुनावनीत खासदार महास्वामी यांनी तलमोड येथील वडिलांच्या नावे असलेले फसल उतारे पुराव्यासाठी सादर केले होते. 


जात प्रमाणपत्र पडताळणीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर सुळ यांनी हे उतारे खातरजमा करण्यासाठी दक्षता पडताळणी समितीकडे दिले होते़ दक्षता पडताळणी समितीने उमरगा तहसिल कार्यालयात जाऊन संबंधित रजिस्टरची तपासणी केली. त्या रजिस्टरमध्ये महास्वामी यांनी सादर केलेले फसल उताºयांची नोंदी सुस्थितीत व पाने चिटकावलेल्या स्थितीत आहे़ तर इतर नोंदी अस्पष्टपणे दिसत असून त्यावर शेतकयांच्या जातीचा कुठेही उल्लेख नाही, त्यामुळे या दोन उतायाबाबत संशय निर्माण होत आहे़ या अनुषंगाने तलमोड येथील सरपंच व तेथील काही नागरिकांचे जबाब नोंदविण्यात आले. तेथील लोकांनी हिरेमठ नावाचे कोणीही आमच्या गावात नव्हते असे सांगितले़ त्यामुळे हे फसल उतारे संशयास्पद असल्याचा अभिप्राय दक्षता समितीने दिला आहे.


याबाबत महास्वामी यांचे वकील न्हावकर यांनी १७५ पानी म्हणणे सादर केले आहे त्यावर तक्रारदार कंदकुर यांनी महास्वामी यांचा मुळ जातीचा दाखला कुठे आहे असा प्रश्न उपस्थित केला़ त्यावर न्हावकर यांनी तो उच्च न्यायालयाकडे सादर केल्याचे सांगितले़ दक्षता समितीच्या अहवालावर म्हणणे मांडण्यासाठी न्हावकर यांनी १५ दिवसाची मुदत मागितली़ त्यावर समितीने १५ फेब्रुवारी ही तारीख नेमली़ आता यापुढे दोघांनेही नव्याने कोणतेही पुरावे सादर करू नये अशी सुचना केली.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: Latest NewsSolapur

संबंधित बातम्या

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
महाराष्ट्रातील मतदारांना मतपत्रिकेचा पर्याय मिळणार? विधानसभेच्या अध्यक्षांनी दिल्या महत्वाच्या सूचना

पोटनिवडणुकीची फेर मतमोजणी करा;शैला गोडसे, सचिन शिंदे, सिद्धेश्‍वर आवताडेसह राष्ट्रवादीची मागणी

May 17, 2021
Next Post
Budget 2020: अर्थसंकल्प जाणून घ्या काय महाग अन् काय स्वस्त

Budget 2020: अर्थसंकल्प जाणून घ्या काय महाग अन् काय स्वस्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मोठा ट्विस्ट! सुप्रिया जगताप यांना भाजपची उमेदवारी, तेजस्विनी कदम यांनी बंडखोरी करत भरला अपक्ष अर्ज, समविचारी कडून सुनंदा आवताडे; तर माजी सभापती यांना उमेदवारी

मोठा ट्विस्ट! सुप्रिया जगताप यांना भाजपची उमेदवारी, तेजस्विनी कदम यांनी बंडखोरी करत भरला अपक्ष अर्ज, समविचारी कडून सुनंदा आवताडे; तर माजी सभापती यांना उमेदवारी

November 17, 2025
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

दुर्दैवी घटना! लेकीसोबत अखेरची भेटही होऊ शकली नाही; मुलीच्या घरी जाताना वाटेत मृत्यू आडवा आला, मंगळवेढा हळहळलं

November 17, 2025
मंगळवेढा ब्रेकिंग! पोलीस पाटलाचा अपघाती मृत्यू

धक्कादायक! कंपनीच्या कामाकरिता जात असताना मोटर सायकलचा अपघात होवून मंगळवेढ्यातील तरुण ठार

November 17, 2025
आता माघार नाही! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी प्रा.तेजस्विनी कदम आज उमेदवारी अर्ज भरणार; पक्षाने दिली तर ठीक, अन्यथा..? जनतेचा पाठिंबा वाढला

आता माघार नाही! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी प्रा.तेजस्विनी कदम आज उमेदवारी अर्ज भरणार; पक्षाने दिली तर ठीक, अन्यथा..? जनतेचा पाठिंबा वाढला

November 17, 2025
राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

मंगळवेढ्यात राजकीय हालचालींना वेग! नगराध्यक्षपदासाठी १ तर नगरसेवक पदासाठी ३७ अर्ज दाखल; नगराध्यक्षपदावरून गुप्त बैठका सुरू

November 16, 2025
विद्यार्थ्यांनी जिद्द, चिकाटी व कठोर परिश्रम घेतल्यास यश निश्चित; आयपीएस बिरुदेव डोणे यांचे मंगळवेढ्यात प्रतिपादन

विद्यार्थ्यांनी जिद्द, चिकाटी व कठोर परिश्रम घेतल्यास यश निश्चित; आयपीएस बिरुदेव डोणे यांचे मंगळवेढ्यात प्रतिपादन

November 16, 2025
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा