मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । देशातील कोरोनाची बाधा झालेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे देशातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी देशाला संबोधित करणार आहेत. गुरुवारी रात्री 8 वाजता मोदी देशवासीयांशी संवाद साधतील.
कोरोना विषाणूच्या होत असलेल्या फैलावाच्या पार्श्वभूमीवर या विषाणूला आळा घालण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांबाबत पंतप्रधान देशवासीयांना माहिती देण्याची शक्यता आहे. तसेच कोरोना विषाणू संबंधीच्या बाबी आणि त्यासंबंधीच्या उपायांबाबत चर्चा करतील.
https://twitter.com/PMOIndia/status/1240320016483926017?s=19
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज