टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर शहर व जिल्ह्यातील कोरोना बाधित व्यक्तींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सोमवारी आठ वाजेपर्यंत तब्बल नवीन 43 कोरोनाबाधित रुग्ण सापडले असून एका महिलेचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.
आज आठ वाजेपर्यंत नव्याने आढळलेल्या 43 व्यक्तींमध्ये 25 पुरुष आणि 18 महिलांचा समावेश आहे. आज आठ वाजेपर्यंत 160 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले आहेत. त्यापैकी 43 पॉझिटिव्ह आले आहेत. सोलापुरात आतापर्यंत कोरोनामुळे 89 जणांचा मृत्यू झाला असून 443 जण कोरोनामुक्त झाले आहेत.
सोलापूर शहर व जिल्ह्यातील 8 हजार 305 व्यक्तींची चाचणी करण्यात आली असून 6 हजार 479 एवढे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. सोलापुरातील कोरोनाबाधित व्यक्तींची संख्या आता 992 झाली असल्याची माहितीही जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.
सोलापुरातील कोरोना आटोक्यात येणार कसा? हा प्रश्न सर्वांसमोर पडला असून सोलापूर शहरातील कोरोना आता जिल्ह्याच्या ग्रामीण भागात जाऊ लागला आहे. अक्कलकोट, बार्शी, माळशिरस, सांगोला, पंढरपूर, दक्षिण सोलापूर या तालुक्यांमध्ये कोरोना बाधित रुग्ण आढळू लागल्याने सोलापुरातील कोरोनाबद्दल चिंता व्यक्त होत आहे.
—————————-
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज