टीम मंगळवेढा टाईम्स।
बँकेच्या दर्शनी भागात लावलेल्या भित्तीपत्रकाचा आधार घेत, तसेच बैंक कर्मचारी व शासकीय यंत्रणेच्या प्रबोधनामुळे केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी प्रधानमंत्री जीवन ज्योती योजनेत सहभाग वाढत आहे. जिल्ह्यातील चार लाख ३२ हजार ५३९ लोकांनी प्रत्यक्षात पैसे भरून सहभाग घेतला आहे.
कोणत्याही व्यक्तींचा नैसर्गिक अथवा अपघाताने शिवाय कशानेही मृत्यू झाला व अशा व्यक्तीचा प्रधानमंत्री जीवन ज्योती योजनेत पैसे भरून विमा घेतला असेल तर वारसांना दोन लाखांपर्यंत रक्कम देण्याची
योजना आहे. या योजनेत समावेश घेणाऱ्या व्यक्तीचा नैसर्गिक मृत्यू झाला, तरी वारसांना दोन लाख रुपये अनेक कुटुंबांना मिळाले आहेत. केंद्र सरकारच्या सामाजिक सुरक्षा योजनांना सोलापूर जिल्हातही मोठ्या प्रमाणावर
नागरिकांचा प्रतिसाद मिळत असून दरवर्षीच अनेक खातेदार व कर्जदार विम्याचा फायदा घेत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील नागरिकांसाठी महत्त्वाकांक्षी विमा योजना २०१५ मध्ये आणली आहे.
विमा योजनेत सहभागी होणे प्रत्येक कुटुंबासाठी गरजेचे आहे. पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजनेत १८ ते ५० वयोगटातील व्यक्ती ४३६ रुपये भरला अन् अशी व्यक्ती कोणत्याही कारणास्तव मयत झाली तर वारसांना दोन लाख रुपये द्यावे लागतात. आमच्याकडील अनेक कुटुंबांना या योजनेचा फायदा झाला आहे. – विक्रम निचळ, शाखाधिकारी, सेंट्रल बँक ऑफ इंडिया,
राष्ट्रीय बँकांचे अधिकारी व कर्मचारी अशा योजनांची माहिती सर्वसामान्य खातेदारांना सांगत नाहीत. राष्ट्रीय बँकांत शक्यतो सर्वसाधारण व्यक्ती जाण्यास धजत नाहीत.
बँकेतील कर्मचाऱ्यांनी सहकार्याची भावना ठेवणे आवश्यक आहे. एखादा व्यक्ती खातेदार व विमा भरलेला असेल अन् अशी व्यक्ती मयत झाल्यानंतर बँकेत खात्याची चौकशी करण्यासाठी राष्ट्रीय बँकेत जावे, असे वाटत नाही. – संतोष पवार, शेतकरी
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 99 70 76 6262 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 99 70 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
विश्वसनीय ऑनलाईन पोर्टल ‘मंगळवेढा टाईम्स’ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 75 88 214 814
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज