टीम मंगळवेढा टाईम्स । कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असल्याने सोलापूरकरांमध्ये भीतीचे वातावरण वाढले असून कोरोनाचा कहर वाढतच चालल्याने सोलापूरकरांच्या चिंतेत भर पडली आहे. गुरुवारी सकाळी 8 वाजेपर्यंतच्या अहवालानुसार सकाळच्या सत्रातच 42 रुग्णांची भर पडली. तर मृत्यू झालेल्यांची संख्याही एकने वाढली. कोरोना नियंत्रणात येत नसल्याने प्रशासनदेखील चिंतेत आहे.
12 एप्रिल रोजी सोलापुरात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. मृत्यूनंतर या रुग्णाचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. अवघ्या दीड महिन्याच्या कालावधीत कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढली आहे.
गुरुवार, 28 मे रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत सोलापुरातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 709 वर पोहोचली आहे. एकूण मृतांचा आकडा आता 67 वर गेला आहे. गुरुवारी सकाळी 8 वाजता आलेल्या शासकीय अहवालानुसार कोरोनाचे आणखी 42 रुग्ण आढळून आले असून यात 17 पुरुष, तर 25 महिलांचा समावेश आहे. गुरुवारी एका पुरुषाचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या 67 वर पोहोचली आहे.मात्र आतापर्यंत 311 रूग्ण करोनामुक्त झाले आहेत.
————————–
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज