टीम मंगळवेढा टाईम्स ।
विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या होणाऱ्या नित्यपूजा करण्यासाठी आता पुन्हा भाविकांना मंदिर समितीकडे बुकिंग करता येणार आहे.
6 फेब्रुवारी 23 ते 31 मार्च 2023 या कालावधीमधील पूजांची नोंदणी उद्यापासून सुरु केली जाणार असल्याचे मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले.
विठुरायाकडील नित्यपूजेसाठी 25 हजार रुपये तर रुक्मिणी मातेकडील नित्यपूजेस 11 हजार रुपये भरून नोंदणी करता येणार आहे. राज्यात दोन वर्षांपूर्वी कोरोना संकट सुरु झाल्याने शासनाच्या नियमानुसार मंदिरे बंद झाली.
18 मार्च 2020 पूर्वी ज्या भाविकांनी या नित्यपूजा नोंदणी केली होती त्या पूजा झाल्या नव्हत्या. साधारणपणे १८ मार्च 2020 ते 1 एप्रिल 2022 या कालावधीत रद्द झालेल्या भाविकांच्या या पूजा पुन्हा निर्बंध उठल्यावर म्हणजे 2 फेब्रुवारी 2022 पासून सुरु करण्यात आल्या होत्या .
त्यामुळे ज्या भाविकांनी नोंद करूनही ज्यांना पूजा करता आली नव्हती अशा सर्व भाविकांच्या पूजा संपल्यानंतर आता पुन्हा मंदिर समितीने नित्यपूजेसाठी नोंदणी सुरु केली आहे.
पुरातत्व विभागाच्या आदेशानुसार विठ्ठल मूर्तीची झीज टाळण्यासाठी पूर्वी होत असलेल्या महापूजा बंद करून रोज होणाऱ्या नित्यपूजेत भाविकांना सहभागी करून घेण्यास सुरुवात झाली.
त्यानुसार रोज पाच भाविक कुटुंबांची नित्यपूजेसाठी नोंद केली जाते.विठ्ठल रुक्मिणी हे वारकरी संप्रदायाचे आराध्य आहे . ज्ञानोबा तुकारामांच्या आधीपासून या मूर्ती कोट्यवधी विठ्ठलभक्ताना प्रेरणा आणि शक्ती देत आल्या आहेत.
विठुरायाकडील नित्यपूजेसाठी 25 हजार रुपये तर रुक्मिणी मातेकडील नित्यपूजेस 11 हजार रुपये भरून नोंदणी करता येणार आहे. राज्यात दोन वर्षांपूर्वी कोरोना संकट सुरु झाल्याने शासनाच्या नियमानुसार मंदिरे बंद झाली.
18 मार्च 2020 पूर्वी ज्या भाविकांनी या नित्यपूजा नोंदणी केली होती त्या पूजा झाल्या नव्हत्या. साधारणपणे १८ मार्च 2020 ते 1 एप्रिल 2022 या कालावधीत रद्द झालेल्या भाविकांच्या या पूजा पुन्हा निर्बंध उठल्यावर म्हणजे 2 फेब्रुवारी 2022 पासून सुरु करण्यात आल्या होत्या.
त्यामुळे ज्या भाविकांनी नोंद करूनही ज्यांना पूजा करता आली नव्हती अशा सर्व भाविकांच्या पूजा संपल्यानंतर आता पुन्हा मंदिर समितीने नित्यपूजेसाठी नोंदणी सुरु केली आहे.
पुरातत्व विभागाच्या आदेशानुसार विठ्ठल मूर्तीची झीज टाळण्यासाठी पूर्वी होत असलेल्या महापूजा बंद करून रोज होणाऱ्या नित्यपूजेत भाविकांना सहभागी करून घेण्यास सुरुवात झाली.
त्यानुसार रोज पाच भाविक कुटुंबांची नित्यपूजेसाठी नोंद केली जाते.विठ्ठल रुक्मिणी हे वारकरी संप्रदायाचे आराध्य आहे . ज्ञानोबा तुकारामांच्या आधीपासून या मूर्ती कोट्यवधी विठ्ठलभक्ताना प्रेरणा आणि शक्ती देत आल्या आहेत.
चीनसह काही देशात कोरोनाच्या नवीन व्हेरियंटचे रुग्ण आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदीर समितीच्या वतीने मंदीरातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी मास्क वापरण्याबाबत सक्ती करण्यात आली आहे. मात्र भाविकांना मंदीरात दर्शनासाठी येताना भाविकांनी मास्कचा वापर करावा असे आवाहन करण्यात आले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज