मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
बचत गटातील महिलांना मंजूर झालेले कर्ज त्यांना न देता ते पैसे परस्पर घेत ७३ महिलांना २५ लाखाला फसविल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत दादासाहेब अनिल मेटकरी (रा. शनिवार पेठ, मेटकरी गल्ली, मंगळवेढा) यांनी फौजदार चावडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादी मेटकरी हे सोलापुरातील फायनान्स कंपनीमध्ये कामाला आहेत. त्यांच्याकडे काही दिवसांपूर्वी एक तक्रार आली. त्यात आरोपी सिद्धेश्वर परशुराम भिसे याने गैरव्यवहार केल्याचे सांगितले.
यानुसार एक टीम नियुक्त करून या घटनेची चौकशी केली. दरम्यान, आरोपी भिसे रुजू झाल्यापासून आतापर्यंत किती महिलांना कर्ज मंजूर झाले, त्यातील किती जणांनी पैसे परत भरले याची चौकशी केली असता
त्यावेळी आरोपीने ७३ महिलांना छोट्या मोठ्या उद्योगासाठी कर्ज मंजूर केले होते. कर्जाचे पैसे न देता आरोपी भिसे याने आरोपी मोहन राजेश्याम नल्ला याच्या इनेबल्ड पेमेंट सिस्टम मशीनवरून कर्जदारांचे पैसे काढून घेतल्याचे निदर्शनास आले.
याबाबत चौकशी केल्यानंतर दोन्ही आरोपींनी सुरुवातील उडवाउडवीची उत्तरे दिली, अशा आशयाची फिर्याद दिली आहे.
याप्रकरणी आरोपी नल्ला व आरोपी भिसे यांनी संगनमत करून सदस्यांची फसवणूक केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज