मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । अलका याज्ञिक म्हणजे बॉलिवूडच्या लोकप्रिय पार्श्वगायिका. आज अलका यांचा वाढदिवस( २० मार्च). यानिमित्त जाणून घेऊ यात, अलका यांच्याबद्दलच्या काही खास गोष्टी कोलकात्यामध्ये जन्मलेल्या अलका याज्ञिक यांनी वयाच्या 6 व्या वर्षापासून शास्त्रीय गायनाचे धडे घ्यायला सुरूवात केली. 1972 पासून त्या आकाशवाणीच्या कोलकाता केंद्रासाठी भजने गात. वयाच्या दहाव्या वर्षी मुंबईमध्ये दाखल झालेल्या अलका यांना वयाच्या 14 व्या वर्षीच पहिला ब्रेक मिळाला आणि यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही.
एका भेटीत राज कपूर यांना अलका यांचा आवाज अतिशय आवडला. त्यांनी अलकांची लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्यासोबत भेट घालून दिली. यानंतर १९८० मध्ये ‘पायल की झंकार’ या चित्रपटात पार्श्वगायिका म्हणून गाण्याची संधी अलका यांना मिळाली. यावेळी त्या केवळ 14 वर्षांच्या होत्या.
यानंतर आठ वर्षांनी आलेल्या ‘तेजाब’ या चित्रपटातील माधुरी दीक्षितवर चित्रीत करण्यात आलेले ‘एक, दो, तीन…; हे गाणे अलका यांना मिळाले आणि या गाण्याने अलका यांना एक नवी ओळख दिली. यानंतर गायिका म्हणजे अलका याज्ञिक असे समीकरण जणू रूढ झाले. आपल्या 30 वर्षांच्या करिअरमध्ये अलकांनी 700 चित्रपटांत 20 हजारांपेक्षा अधिक गाणी गायली आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज