टीम मंगळवेढा टाईम्स।
एका 24 वर्षीय महिलेचा मोटर सायकलवर पाठलाग करून तु मला खूप आवडते, मला तुइयाशी बोलावयाचे आहे. तु मला का बोलत नाही,
तुइया अंगात मस्ती आली आहे असे म्हणून अंगाशी झोंबाझोंबी करून मनाला लज्जा वाटेल असे कृत्य करीत
तु लग्न कशी करते बघतोच अशी धमकी दिल्याप्रकरणी चेतन दिलीप शिवशरण,(रा.माचणूर सध्या कोर्टी ता.पंढरपूर) याच्या विरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, यातील फिर्यादी तथा पिडीत महिला ही दि.3 रोजी नेहमीप्रमाणे घरातील काम उरकून नर्सिंग कोर्सकरीता मंगळवेढा येथे आली होती.
दिवसभर कोर्स करून पुन्हा घरी जाणेसाठी सायंकाळी 5.00 च्या दरम्यान बोराळे नाका बसस्टॉपवर फिर्यादी थांबली असता आरोपीने मोटर सायकलवर पाठलाग करीत येवून तु मला खूप आवडते,
मला तुइयाशी बोलावयाचे आहे.तु मला का बोलत नाही,तुइया अंगात मस्ती आली आहे असे म्हणून फिर्यादीचा हात पकडून ओढाओढी करीत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
व तु लग्न कशी करते मी बघतोच असे म्हणून शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली.
फिर्यादीने घाबरून यावेळी आरडाओरडा केल्यानंतर लोक जमा होत असल्याचे पाहून मोटर सायकलवर आरोपी पळून गेला असल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज