टीम मंगळवेढा टाईम्स ।
शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास सांगून नागरिकांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी बार्शी येथील विशाल फटे हा अटकेत असून त्याला २७ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.
दरम्यान, गुरुवारी सोलापूर ग्रामीण आर्थिक गुन्हे शाखेकडे आणखी आठ जणांनी तक्रारी अर्ज दिल्याने तक्रारदाराची संख्याही शंभराच्या घरात पोहोचली आहे.
आर्थिक फसवणुकीचा आकडा २० कोटी १५ लाख रुपयांच्या पुढे गेला असल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेचे अधिकारी संजीव बोटे यांनी दिली.
विशाल फटे यांनी बार्शीत अनेक व्यक्तींना शेअर मार्केटमध्ये पैसे देण्याचे आमिष दाखवले. तीन वित्तीय संस्थांमध्ये पैसे गुंतवा , असे सांगत जादा पैशाचे आमिष दाखवले. या आमिषाला अनेकजण बळी पडले आहेत.
गुन्हा दाखल झाल्यापासून आत्तापर्यंत ८८ जणांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रारी नोंदवलेले आहेत. बुधवारी हा फसवणुकीचा आकडा १९ कोटींच्या घरात होता. गुरुवारी त्यात वाढ होऊन २० एवढा झाला आहे.
दरम्यान, या प्रकरणातील कागदपत्राची माहिती व चौकशी सुरू आहे. त्याचा मोबाईल नंबर, लॅपटॉप यांची तपासणी सुरू आहे. तसेच त्यांच्या बँकेचे खात्याची स्टेटमेंट मागवण्यात आले आहेत.
सध्या टॅली करण्याचे काम सुरू आहे. शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवले आहेत. ती कागदपत्रे व रेकॉर्डची माहिती घेतली जात आहे. फसवणुकीचा आकडा आणखी वाढेल, अशी शक्यता वर्तविली जात आहे.(स्रोत:पुण्यनगरी)
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 99 70 76 6262 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 99 70 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
विश्वसनीय ऑनलाईन पोर्टल ‘मंगळवेढा टाईम्स’ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 75 88 214 814
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज